शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी; आशिष शेलार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:46 PM2021-09-08T18:46:23+5:302021-09-08T18:48:28+5:30

केवळ सत्तेच्या मोहापाटी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला वसा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागून सोडलाय, शेलार यांचं वक्तव्य.

Shiv Sena against Hindutva and Hindu festivals Allegation of Ashish Shelar | शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी; आशिष शेलार यांचा आरोप

शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी; आशिष शेलार यांचा आरोप

Next
ठळक मुद्देकेवळ सत्तेच्या मोहापाटी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला वसा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागून सोडलाय, शेलार यांचं वक्तव्य.

"एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधून म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे ? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा आमचा सवाल आहे," असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी असल्याचा आरोपही केला. 

माझं घर माझा बाप्पा अस म्हणत ऐकमेकांकडे जाऊ नये असं शासन करत आहे या बद्दल विचारले असता अँड शेलार म्हणाले, "हे सर्व प्रकार म्हणजे शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी असल्याच आहे. काळजी घ्या पण आपला उत्सव साजरा करा अस का म्हणता येत नाही.  केवळ सत्तेच्या मोहापाटी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला वसा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागून सोडला आहे."

"कट कमिशनच्या प्रकरणांवर भाष्य कधी?"
यावेळी त्यांनी अन्य मुद्द्यांवरही भाष्य केलं.डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का याच उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का?, असे काही सवालही त्यांनी यावेळी केले.  

"पब, रेस्तराँ, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का? एक्साईजची कमाई हवी म्हणून दारुची दुकानं उघडी केलीत, माँल मधल्या कामगारांच कारण सांगून मॉल उघडे केलेत मग या मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती,  फुल विकणार्यांच पोट भरु शकत नाही का? यांच्याशी वाटाघाटी होऊ शकत नाही कारण आमचा तो गरीब माणूस या सरकारच्या अपेक्षा काय पूर्ण करणार? म्हणून त्यांना बंदी त्यांच्यावर निर्बंध आणि डिस्को, पब, बार वाले वाटाघाटी करतील, आरोग्य केंद्रात कट कमिशन मिळेल या पद्धतीची भूमिका. आरोग्य केंद्र हवीच पण कट कमिशन नको ही आमची भूमिका आहे. खरतर भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याच काम शिवसेना करतेय. मग गोविंदा असेल, गणेशोत्सव असेल नवरात्र असेल, मंदिर असतील. नियमात राहुन सुरु करु ही भूमिका नाही. भक्तांची देवापासून ताटातूट करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून हा करोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे देऊळ बंदीचं शिवसेनेच अभियान आहे," असंही शेलार म्हणाले.

Web Title: Shiv Sena against Hindutva and Hindu festivals Allegation of Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.