CoronaVirus: आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत, ते भाजपवाल्यांना दिसत नाही; शिवसेनेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:55 PM2021-05-24T20:55:32+5:302021-05-24T20:58:25+5:30

CoronaVirus: भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

shiv sena anand dubey replied atul bhatkhalkar over aaditya thackeray criticism | CoronaVirus: आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत, ते भाजपवाल्यांना दिसत नाही; शिवसेनेचा पलटवार

CoronaVirus: आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत, ते भाजपवाल्यांना दिसत नाही; शिवसेनेचा पलटवार

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेचा भाजपवर पलटवारअतुल भातखळकरांना आनंद दुबेंकडून प्रत्युत्तरआदित्य ठाकरेंवर केली होती टीका

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे परिणाम महाराष्ट्रातही झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी कोरोना मृत्यू चिंता वाढवणारे ठरत आहेत. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. भाजपवाल्यांना ते दिसत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. (shiv sena anand dubey replied atul bhatkhalkar over aaditya thackeray criticism)

मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना शोधून दाखवा आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण मिळवा, अशी योजनाच भाजपच्यावतीनं मी सुरू करणार आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली होती. याला आता शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रत्युत्तर दिले असून, भाजपचे संघटन कमकुवत झाल्याचा चिमटा त्यांनी यावेळी लगावला आहे. 

“तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला”

आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत

भाजपचे कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर म्हणतात की, उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना दाखवा आणि व्हॅक्सिन घेवून जा.. कालच आदित्य ठाकरे मलाड येथे कोविड सेंटरची पाहणी करण्याकरिता आले होते, हे भातखळकरांना दिसले नाहीत. म्हणजे हे तर भाजप संघटन कमजोर झाल्याचे लक्षण आहे, असा टोला लगावत आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. कोव्हिड सेंटर/हॉस्पिटलच्या माध्यमातून तसेच ऑक्सिजनच्या माध्यमातून असो अथवा व्हेंटिलेटर पुरवणे यांसारखी कामे ते सतत करत असतात, असे आनंद दुबे म्हणाले. 

एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

जनता आपल्याला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही

भाजप आमदारांना हे सर्व दिसत नाही. फक्त आणि फक्त राजकारण करणे हेच यांना माहित आहे. आपल्याला कसे राजकारण करता येईल, आपण कसे चर्चांमध्ये येऊ, कसे शिवसेना व महाविकास आघाडीचे नाव खराब होईल, हेच यांचे काम असते. आपल्याला राजकारणाची हौस असली, तरी आम्हांला राजकारण करायचे नाही. आदित्य ठाकरे जिकडे गरज आहे, तेथे लक्षपूर्वक आपली कामगिरी पार पाडत आहेत. लोकांची मदत करत आहेत. तुम्ही फक्त राजकारण करत राहा. जनता आपल्याला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे, असे आनंद दुबे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: shiv sena anand dubey replied atul bhatkhalkar over aaditya thackeray criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.