भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 12:03 AM2019-11-01T00:03:50+5:302019-11-01T00:04:22+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी सत्ता समीकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

Shiv Sena and NCP Will make alliance to keep BJP out of power? | भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी? 

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी? 

Next

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनावरून तिढा निर्माण झाला आहे. भाजपाने सरकारमध्ये शिवसेनेला झुकते माप देण्यास नकार दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख संतप्त झाले आहेत. दरम्यान, भाजपाला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे. 

या वृत्तानुसार राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचे एबीपी माझाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसांत राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल अर्धातास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. यावेळी संजय राऊत यांनी दिवाळीनिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

 दुसरीकडे भाजपाने शिवसेनेला दुय्यम लेखण्याचा पवित्रा कायम ठेवला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं कुणी समजू नये, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहे. 

आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यावेळी उपस्थित आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप करण्याबाबत आडमुठी भूमिका घेणाऱ्या भाजपाला खडेबोल सुनावले. ''युतीची घोषणा करताना सत्तावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार अधिकारपदांचे वाटप व्हायला हवे. कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घातला आहे, असं समजू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले.  
 

Web Title: Shiv Sena and NCP Will make alliance to keep BJP out of power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.