जैतापूर प्रकल्पस्थळी शिवसेनेचा हल्लाबोल
By admin | Published: May 25, 2015 03:20 AM2015-05-25T03:20:56+5:302015-05-25T03:20:56+5:30
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करत शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिकांनी रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास
राजापूर : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करत शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिकांनी रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास प्रकल्पस्थळी हल्लाबोल केला. आतील काम बंद पाडून यंत्रे बाहेर काढायला लावल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांनी मात्र कोणतेही काम बंद पाडले नसल्याचे म्हटले आहे.
आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसैनिक प्रकल्पस्थळी दाखल झाले. प्रवेशद्वारावर वाद घालून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि कामगारांना काम बंद करण्यास भाग पाडले. जेसीबी व अन्य काही यंत्रे त्यांनी कंपनीच्या गेटबाहेर काढायला लावली. हा प्रकार सुरू असताना प्रकल्पस्थळावरून तत्काळ नाटे पोलीस स्थानकाला माहिती देण्यात आली. नाटे पोलिसांनी सर्वांना प्रकल्पस्थळावरून बाहेर काढले. उशिरापर्यंत या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.