पवारांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपाची मोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 01:13 AM2016-11-04T01:13:47+5:302016-11-04T01:13:47+5:30
पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण केली
पिंपरी : पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा गट, तसेच शिवसेना, भाजपा व मनसेची मोट बांधून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
विधान परिषद निवडणुकीतील विलास लांडे यांच्या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. लांडे यांच्या उमेदवारीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा पाठिंबा असल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. लांडे-जगताप ही जोडगोळी अजित पवार यांना शह देणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक आणि शिवसेना-भाजपातील सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी लांडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.(प्रतिनिधी)
>पालिकेतील संख्याबळ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८३, शिवसेना १४, काँग्रेसचे १३, भाजपाचे तीन, मनसेचे चार, अपक्ष दहा, आरपीआय गट एक असे एकूण १२८ नगरसेवक आहेत. त्यांपैकी जगताप गटाचे समर्थक २२, लांडे गटाचे समर्थक २० नगरसेवक आहेत. युती आणि आघाडीचा निर्णय काय होणार? यावरही लढत अवलंबून असणार आहे.