कणकवलीत शिवसेना, भाजपची युती, संदेश पारकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 07:28 PM2018-03-19T19:28:46+5:302018-03-19T19:28:46+5:30

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अखेर शिवसेना व  भाजपची १३ जागांसाठी युती झाली आहे.  

Shiv Sena, BJP alliance in Kankavli | कणकवलीत शिवसेना, भाजपची युती, संदेश पारकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार

कणकवलीत शिवसेना, भाजपची युती, संदेश पारकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार

googlenewsNext

कणकवली  -  कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अखेर शिवसेना व  भाजपची १३ जागांसाठी युती झाली आहे.   भाजप ८ तर शिवसेना ५ जागा लढविणार असून इतर ४ जागांसाठी बोलणी सुरु असून २६ मार्च प्रयत्न त्याबाबत निर्णय होईल. असे सांगतानाच शिवसेना -भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकरच असतील असे  शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक व भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहिर केले.
यावेळी भाजप नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जयदेव कदम, प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष संदेश पटेल, राजन चिके, रविंद्र शेट्ये , शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, राजू राठोड, भास्कर राणे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमोद जठार म्हणाले , कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप मध्ये १३ जागांसाठी तडजोड झाली आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढणार आहोत. उर्वरित जागांवर बोलणी सुरु आहेत. त्याबाबतही लवकरच निर्णय होईल. मंगळवारपासून शिवसेना भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे निवडणुकीचा प्रचार करतील. 
वैभव नाईक म्हणाले, शहराच्या विकासासाठी प्राधान्य देवून आम्ही भाजप सोबत युती केली आहे. उर्वरित जागांचा प्रश्न लवकरच निकाली लागेल. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत युती सर्व जागांवर विजयी होईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी !
कणकवलीतील जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे.त्यामुळे  शिवसेना  -भाजप युतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील. याच शहराने माझे नेतृत्व घडविले आहे. विकासाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. जनता युतीचाच  नगराध्यक्ष  निवडून देईल. त्यामुळे कणकवली हे जिल्ह्यातील एक आदर्श शहर बनवू.असे संदेश पारकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: Shiv Sena, BJP alliance in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.