शिवसेना-भाजपाची युती होणारच; रावसाहेब दानवे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 05:41 AM2018-12-09T05:41:51+5:302018-12-09T05:42:15+5:30

येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला आहे.

Shiv Sena-BJP alliance will continue; Raosaheb Danwe claimed | शिवसेना-भाजपाची युती होणारच; रावसाहेब दानवे यांचा दावा

शिवसेना-भाजपाची युती होणारच; रावसाहेब दानवे यांचा दावा

Next

पालघर : येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला आहे.

पालघर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय पदाधिकाºयांशी भेटून कामाचे नियोजन आणि जबाबदारी निश्चित करीत, पक्ष बांधणीच्या दृष्टीने पालघरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आ.संजय केळकर, आमदार पास्कल धनारे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी स्वत: आणि संघटकमंत्री पुराणिक महाराष्ट्राच्या दौºयावर असून, २० जिल्ह्याचा दौरा पूर्ण करीत निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले. २८८ लोकसभा मतदार संघात विस्तारकांची नेमणूक करून बूथ गठन करण्याचे काम हाती घेतले असून, राज्यातील एकूण ९२ हजार बुथपैकी ८८ हजार बुथचे गठन पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.

एक लोकसभेंतर्गत ६ विधानसभा येत असून, प्रत्येक विधानसभेतील ३०० बुथवर एका अध्यक्षांच्या हाताखाली १५ पुरुष आणि १० महिला अशा कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात आली आहे. त्यामुळे ४० ते ५० लाख कार्यकर्ते निवडणुका जाहीर होताच कामाला सुरुवात करणार असल्याची योजना भाजपाने आखल्याचे त्यांनी सांगितले. या संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आणि प्रधानमंत्री मोदीवर लोकांचा असलेला विश्वास या जोरावर आम्ही २०१९ची निवडणूक जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला. बुलेट ट्रेन उभारणीत शेतकºयांच्या जमिनी गेल्याने त्यांचा विरोध होणारच, पण आमचे सरकार यातूनही मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपाचीच सत्ता येणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत सध्या ताळमेळ राहिला नसून, पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? यावरून भांडणे सुरू आहेत. पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत त्यांना छेडले असता, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा एक्झिट पोल भाजपाच्या विरोधात असताना दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena-BJP alliance will continue; Raosaheb Danwe claimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.