शिवसेना-भाजपा युतीला 45 काय 48 पैकी 48 जागाही मिळतील, शरद पवार यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 08:23 PM2019-02-19T20:23:59+5:302019-02-19T20:26:14+5:30

गेल्या साडे चार वर्षांपासून एकमेकांची उणीदुणी काढत असलेल्या  शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर युती झाली. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती होणारच होती, असे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

Shiv Sena-BJP combine will get 48 seats out of 48 | शिवसेना-भाजपा युतीला 45 काय 48 पैकी 48 जागाही मिळतील, शरद पवार यांचा खोचक टोला

शिवसेना-भाजपा युतीला 45 काय 48 पैकी 48 जागाही मिळतील, शरद पवार यांचा खोचक टोला

Next

मुंबई - गेल्या साडे चार वर्षांपासून एकमेकांची उणीदुणी काढत असलेल्या  शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर युती झाली. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती होणारच होती, असे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या युतीला 45 नाही तर 48 जागा मिळतील, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. 

शिवसेना आणि भाजपामधील युतीबाबत प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार म्हणाले की, शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या युतीमध्ये आश्चर्य असे काही नाही. त्यांच्यातील युती होणारच होती.'' यावेळी शिवसेना आणि भाजपा युती 45 जागा जिंकेल अशा अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावरूनही शरद पवार यांनी युतीला टोला लगावला. शिवसेना आणि भाजपा युतीला 45 काय 48 पैकी 48 जागाही मिळतील, असे ते म्हणाले. 

Web Title: Shiv Sena-BJP combine will get 48 seats out of 48

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.