Exclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 03:14 PM2019-09-01T15:14:27+5:302019-09-01T15:25:37+5:30

शिवसेना-भाजपचे लोकं मला येऊन भेटत असल्याचा दावा जलील यांनी केला आहे.

Shiv Sena bjp Leaders contact with-mim says Imtiaz Jalil | Exclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोट

Exclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोट

googlenewsNext

मोसिन शेख 

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दीड महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागली आहेत. त्यातच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना-भाजप नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. आगामी निवडणुकीत एमआयएमकडून उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना-भाजपचे लोकं मला येऊन भेटत असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. मालेगाव येथे राष्ट्रवादी पक्षातील स्थानिक नेत्यांचा एमआयएममध्ये पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत एमआयएमकडून एकमेव उमेदवार रिंगणात असणारे आणि विजयी झालेले खासदार इम्तियाज जलील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा खुलासा केला आहे. शिवसेना- भाजपचे नेते एमआयएमकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तर या दोन्ही पक्षातील नेते उमेदवारीच्या मागणीसाठी मला येऊन भेटत असल्याचे जलील लोकमतशी बोलताना म्हणाले.

एकीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग वाढली असल्याचे चित्र आहे. तर आत दुसरीकडे त्याच सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या जलील यांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील भाजप-सेनेचे अनेक नेते मला भेटत असून त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी केली असल्याचा खुलासा सुद्धा जलील यांनी केला आहे..

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत जात एमआयएमने औरंगाबाद मतदारसंघातून जलील यांना रिंगणात उतरवले होते. याच निवडणुकीत जलील यांनी माजी खासदार चंद्रकात खैरे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यांनतर विविध महानगरपालिका, नगरपरिषदचे नगरसेवक यांची एमआयएममध्ये इनकमिंग सुरु झाली असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातील जवळपास सर्वच काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील होते. मात्र आता थेट विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपचे नेते एमआयएम पक्षात येण्यासा इच्छुक असल्याने राज्यातील राजकरणात मोठा भूंकप होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Shiv Sena bjp Leaders contact with-mim says Imtiaz Jalil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.