शिवसेना, भाजपने वाद मिटवावे
By admin | Published: August 7, 2014 11:42 PM2014-08-07T23:42:58+5:302014-08-07T23:42:58+5:30
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यातील आपसांतील जागांबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवावा़ महायुतीत वाद निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा नाही;
Next
>पुणो : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यातील आपसांतील जागांबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवावा़ महायुतीत वाद निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा नाही; पण आमचे पक्ष छोटे आहेत, लोकांर्पयत पोहोचण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आह़े त्यामुळे महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या आम्ही तिघांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, असे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितल़े
स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या महायुतीतील घटक पक्षांची पुण्यात बैठक झाली़ तिन्ही पक्षांनी अनेक जागांवर दावा केला होता़ त्यांपैकी जवळपास 35 जागांवर तिन्ही अथवा दोन पक्षांनी दावा केल्याचे या बैठकीत दिसून आल़े याशिवाय प्रचार, प्रसार कशा पद्धतीने करायचा याची चर्चा या बैठकीत झाली़ महायुतीतील घटक पक्षांनी अवास्तव जागांची मागणी केली असल्याचा प्रचार होत असल्याबद्दल या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली़
घटक पक्षांची बैठकीची दखल घेऊन शिवसेना-भाजपमधील काही नेत्यांनी या नेत्यांना काल फोन केल़े तुमची बैठक होऊ द्या; त्यानंतर आपण बोलू़ अनेक फोन येऊ लागल्यावर बैठकीसाठी त्यांनी आपले फोनच बंद ठेवले होत़े
याबाबत विनायक मेटे म्हणाले, ‘‘महायुतीतील शिवसेना आणि भाजपबरोबर आमची 28 जुलै रोजी चर्चा झाली होती़ त्या वेळी 5 ऑगस्टर्पयत जागावाटपाबाबत चर्चा सुरू करू, असे सांगण्यात आले होत़े पण, अजूनही या मुख्य दोन पक्षांतील जागावाटप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांना कोणताही निरोप नाही़ आमच्या दृष्टीने हा वेळ खूप महत्त्वाचा आह़े त्यामुळे शिवसेना, भाजप या मोठय़ा पक्षांबरोबर चर्चा करण्याअगोदर आपल्यातील जागांविषयीची चर्चा करू, काही मुद्दे निश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली़’’
आम्हा तीन पक्षांना जवळपास
5क् जागा मिळाव्यात, अशी
अपेक्षा व्यक्त करून मेटे म्हणाले, ‘‘आमच्या तिघांमधील एकमेकांना क्रॉस होणा:या जागांमध्ये कोणाची किती ताकद आहे, याची चाचपणी केली़ आम्ही कधीही अवास्तव जागांची मागणी केलेली नाही़ शिवसेना, भाजप यांना ज्या जागांवर मागील 2 निवडणुकांमध्ये विजय मिळविता आला नाही आणि जेथे आमची ताकद आहे, काम आहे, अशाच जागांची मागणी केली आह़े (प्रतिनिधी)
जाहीरनामा समिती अजूनही नाही
महायुतीची जाहीरनामा समिती तयार करण्याची चर्चा झाली होती़ पण अजूनही अशी समिती तयार करण्यात आली नाही़ महाराष्ट्रापुढे जाऊन आपण काय शब्द देणार, जनतेला काय सांगणार, याची चर्चा होण्याची आवश्यकता आह़े त्यादृष्टीने आम्ही चर्चा केली़
शिवसेना, भाजपच्या नेत्यांशी येत्या 9 किंवा 11 ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता आह़े राष्ट्रीय समाज पक्षाचा मुंबईत वर्धापन दिनानिमित्त मेळावा आह़े त्या ठिकाणी सर्व जण एकत्र येणार असल्याने तेव्हा चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितल़े