शिवसेना-भाजपा एकत्र येऊन दाखवणारच! चंद्रकांत पाटील

By admin | Published: March 3, 2017 11:11 AM2017-03-03T11:11:01+5:302017-03-03T15:59:44+5:30

महापालिकेतील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच सेना-भाजपा एकत्र येतील असा विश्वास चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केला आहे.

Shiv Sena-BJP will come together! Chandrakant Patil | शिवसेना-भाजपा एकत्र येऊन दाखवणारच! चंद्रकांत पाटील

शिवसेना-भाजपा एकत्र येऊन दाखवणारच! चंद्रकांत पाटील

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ३ - मुंबई महापालिकेच्या महापौराची निवड ८ मार्चला होणार असली तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने महापौर भाजपाचा की शिवसेनेचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यात जरी युती असली तरी महापालिका निवडणुकीत सेना-भाजपा एकत्र येण्यास तयार असून एकमेकांवर आरोपांची राळ उडवली जात आहे. असे असतानाच ' शिवसेना-भाजपा एकत्र येतील याची २०० % खात्री आहे' असे वक्तव्य भाजपा नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच ' दोन्ही पक्ष एकत्र यावेत यासाठी मी स्वत: प्रयत्न करेन' असेही ते म्हणाले.  संघाच्या काही नेत्यांनीही मुंबईत सेना-भाजपा युतीशिवाय पर्याय नाही असे वक्तव्य केलेले असतानाच आता भाजपाच्या नेत्यांनीही युतीसाठी रुजवात घालण्याच संकेत दिल्याने लवकरच महापालिकेतही युतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
(भाजपाचं संख्याबळ वाढलं, गीता गवळींचा पाठिंबा)
 
महापालिका निवडणुकीत ८४ जागा मिळवून शिवसेना पहिल्या तर ८२ जागांसह भाजपा दुस-या स्थानावर आहे. मात्र दोघांपैकी कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्तास्थापनेसाठी आणि पर्यायाने महापौरपदासाठी दावा करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. काही बंडखोर उमेदवार पक्षात परतल्याने आणि अपक्षांपैकी काहींनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ ८८च्या आसपास पोचले आहे. तर अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी महापौरपदासाठी भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपाचेही संख्याबळ वाढलं असून महापौरपदावरील दावा बळकट करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. 
मात्र असे असले तरीही अद्याप एकाही पक्षाला बहुमताच्या जवळपासचा आकडाही गाठता न आल्यान सत्तेसाठीची ही रस्सीखेच काही काळ अशीच सुरू राहणार असल्याचे दिसत आहे. 
 

Web Title: Shiv Sena-BJP will come together! Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.