वैजापुरात शिवसेना उमेदवाराचं टेन्शन वाढलं; भाजप जिल्हाध्यक्षांनी दाखल केली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:46 PM2019-10-03T17:46:14+5:302019-10-03T17:46:24+5:30

वैजापूर तालुक्यात मागील दोन वर्षात भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पंचायत समिती, नगर परिषदसह जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने सदस्य देण्यात भाजपला यश आले. या यशाच्या बळावर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती.

Shiv Sena candidate's tension increased in Vaijapur; BJP district chief filed a nomination | वैजापुरात शिवसेना उमेदवाराचं टेन्शन वाढलं; भाजप जिल्हाध्यक्षांनी दाखल केली उमेदवारी

वैजापुरात शिवसेना उमेदवाराचं टेन्शन वाढलं; भाजप जिल्हाध्यक्षांनी दाखल केली उमेदवारी

googlenewsNext

मुंबई - उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. तिकीटीच्या शर्यतीतून मागे पडलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आणि माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरणारे यांचे टेन्शन वाढले आहे.

जाधव आणि परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या व्यतिरिक्त आणखी चार अपक्ष अर्ज दाखल झालेले आहेत. वैजापूर तालुक्यात मागील दोन वर्षात भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पंचायत समिती, नगर परिषदसह जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने सदस्य देण्यात भाजपला यश आले. या यशाच्या बळावर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती.

याच काळात माजी नगराध्यक्ष डॉ. परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला. त्यामुळे त्यांना देखील पक्षाकडून उमेदवारीचे आश्वासन मिळाले होते. मात्र ऐन निवडणुकीत युती झाली आणि वैजापूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यानंतर जाधव आणि परदेशी यांनी बंडखोरीची भूमिका घेत अर्ज दाखल केले.

गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत गंगापूर विधानसभेचे आमदार प्रशांत बंब यांचे उदाहरण देत जाधव यांनी वैजापूरमध्ये इतिहास घडविणार असल्याचे नमूद केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे, सचिव मोहन आहेर, किसान सेलचे अध्यक्ष कैलास पवार, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नबी पटेल, भाजपचे गटनेते दशरथ बनकर आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena candidate's tension increased in Vaijapur; BJP district chief filed a nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.