शिवसेनेने पुढे केला मदतीचा हात

By admin | Published: September 21, 2016 03:32 AM2016-09-21T03:32:58+5:302016-09-21T03:32:58+5:30

अन्नातून जीवनदान या संकल्पनेतून शिवसेनेच्या अंबरनाथ शाखेच्यावतीने मोखाड्यातील हजारो आदिवासी बांधवांना मंगळवारी सकाळी अन्न धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकीचा वसा जपला.

Shiv Sena carried out a helping hand | शिवसेनेने पुढे केला मदतीचा हात

शिवसेनेने पुढे केला मदतीचा हात

Next


मोखाडा : अन्नातून जीवनदान या संकल्पनेतून शिवसेनेच्या अंबरनाथ शाखेच्यावतीने मोखाड्यातील हजारो आदिवासी बांधवांना मंगळवारी सकाळी अन्न धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकीचा वसा जपला.
खोच, विकासवाडी, कळमवाडी या गावपाड्यातील दोन हजार आदिवासी गरजू कुटुंबाना धान्याचे वाटप करण्यात आले आहे. मोखाड्यातील खोच येथील ईश्वर सवरा आणि कळमवाडी येथील सागर वाघ या बालकांचा भूकबळी झाल्याने कुपोषणाचे भीषण वास्तव समोर आले आहे. यामुळे अन्नवाचून पुन्हा भूकबळी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या अंबरनाथ शाखेने पुढाकार घेत टप्याटप्याने गरज विचारात घेऊन ३१ हजार किलो धान्यवाटप केले जाणार आहे.
दानशूरांना केले होते आवाहन
अंबरनाथ येथील शिवसैनिकांनी सगळ्या व्यापारी व दानशूरांना या गंभीर बाबीची कल्पना देऊन त्यांच्या प्रयत्नातून आदिवासी बांधवाना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला याचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी अरविंद वाळेकर (शहर प्रमुख अंबरनाथ) बालाजी किणीकर (आमदार) उत्तम पिंपळे (जिल्हा अध्यक्ष पालघर) सुनील चौधरी (अंबरनाथ नगर अध्यक्ष) प्रकाश निकम (जिल्हा परिषद सदस्य) सारिका निकम (सभापती मोखाडा पंचायत समिती) अमोल पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Shiv Sena carried out a helping hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.