CM Uddhav Thackeray Aurangabad Speech: हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो?, मुख्यमंत्र्यांचा सवाल

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:05 PM2022-06-08T19:05:02+5:302022-06-08T20:49:29+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता.  उद्धव ठाकरे यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ...

Shiv Sena chief CM Uddhav Thackeray Speech in Aurangabad Live Updates in Marathi congress ncp min mns rajya sabha election | CM Uddhav Thackeray Aurangabad Speech: हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो?, मुख्यमंत्र्यांचा सवाल

CM Uddhav Thackeray Aurangabad Speech: हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो?, मुख्यमंत्र्यांचा सवाल

Next

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा पार पडली. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. 

LIVE

Get Latest Updates

09:05 PM

आमच्या हिंदुत्वाची मोजमापं घेऊ नका - मुख्यमंत्री

आमच्या हिंदुत्वाची मोजमापं घेऊ नका. हृदयात राम आहे. हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. फडणवीसांच्या भाषेमध्ये गधाधारी नाही, गध्यांना आम्ही सोडलंय - मुख्यमंत्री

09:05 PM

आमचे हे हात ढेकणं चिरडणारे नाही, तर हिंदुत्वाचं रक्षण करणारे - मुख्यमंत्री

आमचे हे हात ढेकणं चिरडणारे नाही, तर हिंदुत्वाचं रक्षण करणारे आहेत. जो या देशासाठी मरायला, जगायला तयार आहे तो आमचा आहे. ते आमचं हिंदुत्व आहे.

09:04 PM

आपत्ती असेल तर पहिला धावून जातो तो शिवसैनिक - उद्धव ठाकरे

आपत्ती असेल तर पहिला धावून जातो तो शिवसैनिक. त्याची पाळमूळं खोलवर गेलीये, ती उपटू म्हटलं तरी तुमच्या पिढ्या बाजूला पडतील, विचार बाजूला पडणार नाही - उद्धव ठाकरे.

09:03 PM

प्रवक्त्यांच्या वाचाळपणामुळे देशाची अब्रू गेलीये, त्याची भरपाई कोण करणार - मुख्यमंत्री

तेव्हा सात पैशांनी पेट्रोल वाढल्यावर अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीवर बसून संसदेत गेले होते. तोच भाजप आम्ही आज शोधतोय. मला भागवत साहेबांना विनंती करायची आहे, ही परिस्थिती अपेक्षित होती काय. भाजपची आजची जी वागणूक आहे हीच तुम्हाला अपेक्षित होती का? आज जे तुमचे प्रवक्ते बोलतायत, प्रवक्त्यांच्या वाचाळपणामुळे देशाची अब्रू गेलीये. त्याची भरपाई कोण करणार - मुख्यमंत्री

08:59 PM

"गोपीनाथ मुंडेंनी मागणी करताच बाळासाहेबांनी भाजपाला महापौर पद दिलं"

एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा ते यावेळी महापौर आम्हाला द्या, अशी मागणी शिवसेनाप्रमुखांकडे  केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला. ते तेव्हा कागदावर आकडेमोड करत बसले नाही - मुख्यमंत्री

08:55 PM

मित्र होते ते वैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले -मुख्यमंत्री

पंचवीस तीस वर्ष ज्यांना मित्र म्हणून मांडीवर बसवलं तो उरावल बसायला लागला. ज्यांच्याशी भांडत होतो त्यांनी मानसन्मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करण्याची साथ दिली. मित्र होते ते वैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले - उद्धव ठाकरे

08:53 PM

... ही वाटचाल सोपी नव्हती, पुढचीही वाटचाल सोपी नाहीये - उद्धव ठाकरे

रोज ज्यांच्या स्वप्नात आज सरकार पडणार, मी पुन्हा येणार ते आज चिमटे काढून पाहतायत अडीच वर्ष झाली प्रशसनाचा अनुभव नसलेली व्यक्ती तिकडे बसलीय.तुम्हाला त्यासाठी धन्यवाद द्यायचे. ही वाटचाल सोपी नव्हती. पुढचीही वाटचाल सोपी नाहीये - उद्धव ठाकरे

08:50 PM

हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो?, मुख्यमंत्र्यांचा सवाल

हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. भाजप जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे म्हणून संघावर टीका केल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.

08:47 PM

मोहन भागवतांनी घेतलेली भूमिका चांगली - मुख्यमंत्री

मोहन भागवतांनी घेतलेली भूमिका चांगली आहे. त्यामुळे बरं वाटलं. का वाटलं कारण सध्या आपण नाजूक परिस्थितीतून चाललो आहोत. अर्थाचं गाडं रुळावरून घसरलंय, शिक्षणाचा बट्याबोळ झालाय - उद्धव ठाकरे

08:41 PM

"भाजपने आपल्या बेलगाम प्रवक्त्यांच्या डोक्यात अक्कल घालावी"

आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपने आपल्या बेलगाम प्रवक्त्यांच्या डोक्यात जर मेंदू असेल तर त्यात अक्कल घातली पाहिजे. ते वाटेल ते बोलतायत. माझा एकही प्रवक्ता तसं बोलला नाही. पण जर संयम सुटला तर तुमच्याच शब्दात टीक केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात साधू संतांची भूमी आहे. हा भगवा केवळ केवळ फडकवायला हाती दिला नाही. यापाठी जे विचार आहेत ते धमन्यांमध्ये येणार नसतील, तर उपयोग काय - उद्धव ठाकरे.

08:41 PM

आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेश करत नाही - उद्धव ठाकरे

आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेश करत नाही. अनेकदा शिवसेना प्रमुखांनी आपला धर्म घरात ठेवायचा सांगितलं. जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा देश हाच घर्म असं समजून बाहेर पडायचं. पण दुर्देवानं आम्ही ही भूमिका घेऊन बाहेर पडलो आणि आमच्या अंगावर कोण आलं तर देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री

08:36 PM

हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा वाचा - मुख्यमंत्री

काश्मीरी पंडितांचा गुन्हा काय? पुन्हा तिच वेळ आली आहे. घरात, शाळेत जाऊन गोळ्या घातल्या जातायत. हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा वाचा. नामर्दांचं हिंदुत्व आमच्याकडे नाही. हिंमत असेल तर तिकडे जा - मुख्यमंत्री

08:34 PM

आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण, उद्धव ठाकरेंचा सवाल

आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण. असं आम्ही काय केलंय जे तुम्ही बोंबलत सुटलात. खुल्या मंचावर हे होऊन जाऊ द्या. बाबरी पाडल्यावर यांची पळापळ झाली होती. फडणवीसांच्या दाव्याबाबतही मी बोललो होतो. अनेक शिवसैनिक तिकडे गेले होते. जर सावे गेले नसतील तर तुमच्याकडे आलेल्या त्यांच्या चिरंजिवांनी ते सांगावं. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमदार झालेत. खरं खोटं काय ते होऊन जाऊ द्या - उद्धव ठाकरे

08:31 PM

संभाजीनगरची शान वाढवणारे विकासकाम आम्ही करत आहोत - मुख्यमंत्री

08:31 PM

नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहिजे - मुख्यमंत्री

संभाजीनगर कधी करणार हे विचारतात. ते माझ्या वडिलांनी दिलेलं वचन आहे, ते केल्याशिवाय मी राहणार नाही. मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे. सुरूवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव केंद्राकडे दिलाय. का होत नाहीये. तुमच्याकडे काही दिलं तर झाकायचं आणि आमचं बोंबलत सुटायचं. जेव्हा मी नामातर करेन तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श वाटेल अभिमान वाटेल असं करेन - उद्धव ठाकरे

08:28 PM

हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये - मुख्यमंत्री

08:27 PM

... तो आक्रोश सत्ता गेल्यामुळे होता - उद्धव ठाकरे

मध्ये जो होता तो आक्रोश मोर्चा जनतेसाठी नव्हता. सत्ता गेल्यामुळे आक्रोश होता. पाण्यासाठी आक्रोश असता पाच वर्ष तुम्ही बसला होता, आम्ही सोबत होतो. निवडणूक आलं की काहीतरी तोंडावर फेकायचं आणि जिंकल्यावर तंगवत ठेवायचं, हे खोटं बोलण्याचं हिंदुत्व आमचं नाही - मुख्यमंत्री

08:25 PM

पाण्याच्या वेदना कमी होतायत - मुख्यमंत्री

कल्पना आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पाणीप्रश्न बिकट होता. पाच पाच दिवसांनी येणारं पाणी दहा दिवसांनी येत होतं. वेदना बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या वेडापायी येथे आलायत. या वेदना आता कमी होतायत हे तुम्हीच सांगा - उद्धव ठाकरे

08:23 PM

"शिवसेना प्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगर मध्ये आलोय"

08:21 PM

ढेकणं चिरडायला सैनिकांची शक्ती वाया घालवायची नाही - उद्धव ठाकरे

प्रश्न असा पडलाय की शिवसेना प्रमुख सांगायचे ढेकणं चिरडण्याला तोफेची गरज नसते. ढेकणं आम्ही अशीच चिरडतो. सैनिकांनी शक्ती वाया घालवायची नाही - उद्धव ठाकरे

08:18 PM

मैदानही पुरत नाही अशी आपली ताकद वाढतेय - मुख्यमंत्री

महापालिका पहिल्यांदा जिंकलो तेव्हा पहिल्यांदा इथे सभा झालेली. तेव्हा मी बाजूच्या गच्चीतून सभा पाहत होतो. आजही काळ लोटला तरी मैदानाचा कोपरा भरला आहे. मैदानही पुरत नाही अशी आपली ताकद वाढतेय - मुख्यमंत्री

08:15 PM

हिंमत असेल तर कैलास मानसरोवर येथील शिवलिंग आमच्या ताब्यात द्या - राऊत

महागाईवर प्रश्न विचारला तर ज्ञानव्यापीवर बोलतात. बेरोजगारीवर विचारलं तर ताजमहालाच्या खाली शिवलिंग शोधतात. ताजमहालाच्या खाली शिवलिंग शोधण्यापेक्षा कैलास मानससरोवर आजही चीनच्या ताब्यात आहे. हिंमत असेल तर तिथलं शिवलिंग आमच्या ताब्यात द्या आणि मग इतर शोधा - संजय राऊत

08:10 PM

छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्र्यांचं अभिवादन

08:02 PM

... तर पाणी मागायलाही उठणार नाही, राऊतांचा भाजपवर निशाणा

३७ वर्षांपूर्वी एक शाखा तयार झाली, त्याचा वर्धापन दिन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होतोय यासारखा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या जीवनात आला नसेल. तेव्हा कोणाच्या स्वप्नातही उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहतील हे कोणाला वाटलंही नसेल. समोर असलेल्या जनतेच्या लाटेचा तडाखा जर भाजपला बसला तर पाणी मागायलाही उठणार नाही, अशी लाट इकडे उसळली आहे, राऊतांनी साधला निशाणा.

08:02 PM

काश्मीरातील हिंदू उद्धव ठाकरेंकडे अपेक्षेनं पाहतायत; शिवसेना, महाराष्ट्र आधार देईल - संजय राऊत

पहिल्या पाचाच्याही वर जातो असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. हे लोक आक्रोश मोर्चा काढतात. यांनी काश्मीरात जाऊ आक्रोश मोर्चा काढावा. रोज तिकडे हिंदू पंडितांवर हल्ले होतायत. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतायत. सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेवून बसलंय. काश्मीरी पंडितांचं गुन्हा काय? काश्मीरातील हिंदू उद्वव ठाकरेंकडे अपेक्षेनं पाहतायत. शिवसेना, महाराष्ट्र आधार देईल, अनेक काश्मीरी पंडित अशी अपेक्षा करतायत - संजय राऊत

07:56 PM

आंतरराष्ट्रीय कंपनी शहरासाठी नव्या स्वरूपाचा आराखडा तयार करेल - देसाई

शहराचा चेहरामोहरा बदलला पाहिजे असा विचार केला. जुन्या पिढीची निर्मिती चालणार नाही. आंतरराष्ट्रीय कंपनी नव्या स्वरूपाचा आराखडा तयार करेल. जगभरात हॅपिनेस इंडेक्स म्हणतात ते उंचवण्याचं काम सुरू आहे - सुभाष देसाई

07:54 PM

संभाजीनगर पर्यटन विकास प्राधिकरण स्थापण्याचा विचार - देसाई

शहरातही मेट्रो असलीच पाहिजे. याचं आराखडा तयार करण्याचं काम महापालिकेनं सुरू केलंय. लवकरच मेट्रो धावतानाही दिसेल. शहर आधुनिक होतंय. यासाठी संभाजीनगर पर्यटन विकास प्राधिकरण स्थापण्याचा विचार आदित्य ठाकरे करतायत, देसाई यांची माहिती

07:52 PM

पाणी योजना पूर्ण झाल्यावर घराघरात शुद्ध पाणी मिळणार - सुभाष देसाई

जिल्ह्याची पाणीपातळी वाढली आहे. तज्ज्ञांनीही भूजलपातळी वाढल्याचं सांगितलं. १६८० कोटी रुपयांची योजनाही सुरू करण्यात आली आहे. दरवाढीचा मुद्दा सोडवण्यात आलं. ठेकेदाराला तंबी दिली, काम मंदावल्यास तुरूंगात टाकणार. त्यानंतर त्यानं आश्वासन दिलं जायकवाडी ते संभाजीनगर पाणीयोजना दोन वर्षांत पूर्ण करेन. योजना पूर्ण झाल्यावर घराघरात शुद्ध पाणी मिळणार - सुभाष देसाई

07:50 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभास्थळी रवाना

07:43 PM

आम्ही शिवसैनिक आहोत, कोणाला सोडत नाही - खैरे

भाजपचे लोक उद्धव ठाकरे, कुटुंबीयांवर सर्वांवर जर बोलणार असतील तर सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या बाबतीत काही बोलले तर त्यांचं तोंड लाल करू. आम्ही शिवसैनिक आहोत, कोणाला सोडत नाही.

07:43 PM

महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेवर भगवाच फडकणार - चंद्रकांत खैरे

खोटा करणाऱ्या लोकांना सरळ केलंच पाहिजे. संभाजीनगर महापालिकेवर भगवा झेंडाच फडकणार. या शहरावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून भगवाच फडकणार असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

07:41 PM

अध्यक्ष असताना दानवेंनी युती धर्म पाळला नाही - खैरे

अध्यक्ष असताना दानवेंनी युती धर्म पाळला नाही. मलाही धोका दिला. रुग्णालयात असल्याचं सांगून ट्रॅक्टर चालवला. छत्रपतींचा भगवा झेंडा खाली उतरवला, तर रझाकारांचा हिरवा झेंडा चढवण्याचं काम केल्याचा आरोप खैरे यांनी केला.

07:40 PM

पाच वर्ष भाजप सत्तेत असताना काय केलं?, चंद्रकांत खैरे यांचा सवाल

पाच वर्ष भाजप सत्तेत असताना काय केलं?, पाण्याची योजनाही पूर्ण केली नाही. समांतर जलवाहिनी आणली त्यातही भाजपनं खोडा घातला. मुख्यमंत्र्यांनी आता पैठणपासून वॉटर ग्रीडचा मोठा कार्यक्रम केला - खैरे

07:32 PM

हे सर्व महापुरूष हायजॅक करतायत - अर्जुन डांगळे

आज हे सर्व आपले महापुरूष हायजॅक करत आहेत. शिवाजी महाराजांना हायजॅक केलं. भाजपच्या चिंतन शिबिरात शिवाजी महाराज साडेतीन जिल्ह्यांचे राजे होते असं शिकवलं जातं. आज शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. घटनाकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं आणि त्यांची घटना पायदळी तुडवली जाते. फडणवीस मुख्यमंत्री असताना दादरमधील आंबेडकर भवन कोणी पाडलं? कोणाच्या सहाय्यानं पाडलं, भूमिपूजन शिवाजी पार्कातील ठिकाणी केलं - अर्जुन डांगळे 

07:24 PM

विरोधाला विरोध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं भाजपकडून काम - अब्दुल सत्तार

संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची महासाथ आणि भाजपला दूर करण्याचं काम केलं त्यामुळे त्यांचा सत्कार करायला पाहिजे. संकटात राजकारणात, समाजकारणात, सेवेत विरोधीपक्षाचे जे कर्तव्य आहे ते पार पाडत नाही. विरोधाला विरोध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बदनाम करणं आणि केंद्रातील सत्ता त्यांच्या एजन्सीकडून आवाज दाबण्याचं काम सुरू असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला.

07:17 PM

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापूर्वी भाजप, आंबेडकरी कार्यकर्त्यांना अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यापूर्वी भाजपचे पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शहरातील पाणी प्रश्न आणि विविध समस्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टी तर्फे देण्यात येत होते. तर विद्यापीठच्या विभाजनास विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

07:15 PM

उद्धव ठाकरे भाषणात अनेकांचा समाचार घेणार - खोतकर

शिवसेनेच्या ताकदीवर मोठी झालेली भाजप आपले रंग दाखवत आहे. भाजपच्या लोकांकडून खोट्या आरोपांचं सत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात अनेकांचा समाचार घेतील, असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलं.

Web Title: Shiv Sena chief CM Uddhav Thackeray Speech in Aurangabad Live Updates in Marathi congress ncp min mns rajya sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.