खोके सरकार आल्यापासून राज्यात पनवती सुरू, मी मुख्यमंत्री असतो तर...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 06:43 PM2022-11-26T18:43:10+5:302022-11-26T18:43:33+5:30

मी घरात बसूनही कामे केली, त्याचे कौतुक होतंय. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Shiv Sena chief Uddhav Thackeray criticized CM Eknath Shinde and BJP | खोके सरकार आल्यापासून राज्यात पनवती सुरू, मी मुख्यमंत्री असतो तर...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खोके सरकार आल्यापासून राज्यात पनवती सुरू, मी मुख्यमंत्री असतो तर...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

googlenewsNext

मुंबई - जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. उद्योगधंदे तिकडे गेले तर राज्यात बेरोजगारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचा. छत्रपतींचा अपमान करून आदर्श मोडायचा. सोलापूर कर्नाटकात गेल्यानंतर माझा पंढरपूरचा विठोबाही कर्नाटकात जाणार. लाखो कोट्यवधी भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटकात जाणार. महाराष्ट्रातलं दैवत पंढरपूर, अक्कलकोट पळवणार असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना गुवाहाटीला जायची गरज भासली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात. मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊच दिली नसती. शिवसेना जिवंत सळसळत रक्त. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. डोकं आपटावं लागेल पण माझी शिवसेना तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका लांबवतायेत. मी तुमच्या भरवशावर उभा आहे. तुमच्या संकटात मी उभा आहे. आत्महत्या अजिबात करायची नाही. आपण शिवरायांचे नाव घेतो मग शिवरायांनी आपल्याला लढायचं शिकवलंय असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी घरात बसूनही कामे केली, त्याचे कौतुक होतंय. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा. पोळ्याला बैलाला सजवलेलं पन्नास खोके. तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. ह्या मिंधे सरकारकडून काही अपेक्षा नाही. नवीन युवक शक्ती येत आहे. आपण हिंदुत्वावरुन कुणाला फसवले नाही. काश्मीरमध्ये भाजपा मेहबूबा सोबत गेले तेव्हा काय होते? मी काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन धाराशिव आणि संभाजीनगर करुन दाखवले. आम्ही काही सोडलेले नाही बोक्यांना खोक्यांची भूक म्हणून हे गद्दारी करुन गेले. काय कमी केले होत तुमचं? या गोरगरिबांनी तुम्हाला निवडून गेले. आज तात्पुरता सत्ता पण देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायमची अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही
छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला. अब्दुल गटार, त्याने सुप्रिया सुळेचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर कुठल्याही महिलेचा अपमान झाला असता तर लाथ मारून हाकलवून दिला असता. जसा एकाला हाकलला. महिलेचा अपमान झाला हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात जे चाललंय ते पसंत नाही आज आम्ही सरकारमधून बाहेर पडतोय हे जाहीर करा. स्वत:वर विश्वास नाही म्हणून गुवाहाटीला जाता असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Shiv Sena chief Uddhav Thackeray criticized CM Eknath Shinde and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.