‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेचं पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:16 PM2022-05-11T12:16:58+5:302022-05-11T12:17:11+5:30

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत.

shiv sena cm uddhav thackleray rally on 14th may shares poster on hindutwa and jobs giving on twitter | ‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेचं पोस्टर

‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेचं पोस्टर

Next

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. दरम्यान, यानंतर शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच आता त्यांनी एक पोस्टरही जारी केलं आहे.

‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ असल्याचं शिवसेनेनं त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. तसंच यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. तसंच ही सभा कुठे आणि किती वाजता आयोजित करण्यात आली असून ‘यायलाच पाहिजे’ असंही  त्यावर नमूद करण्यात आलंय.


यापूर्वी काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
१४ तारखेला सभेत जे मनात आहे ते मी बोलणार. माझे काही तुंबलेले नाही. पण मनामध्ये आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. तसंच यापूर्वी शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर करत मनसेवरही जोरदार टीका केली होती.

Web Title: shiv sena cm uddhav thackleray rally on 14th may shares poster on hindutwa and jobs giving on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.