कोकणात सत्तेसाठी शिवसेना- काँग्रेसची आघाडी

By Admin | Published: December 26, 2016 01:25 PM2016-12-26T13:25:09+5:302016-12-26T13:27:05+5:30

परस्परांचे कट्टर वैचारीक विरोधक असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसने कोकणात नगरपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी हातमिळवणी केली आहे.

Shiv Sena-Congress alliance for power in Konkan | कोकणात सत्तेसाठी शिवसेना- काँग्रेसची आघाडी

कोकणात सत्तेसाठी शिवसेना- काँग्रेसची आघाडी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

दापोली, दि. 26 - परस्परांचे कट्टर वैचारीक विरोधक असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसने कोकणात नगरपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी हातमिळवणी केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असूनही विरोधकांसारखे वागणा-या शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यात दापोली नगर पंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसला सोबत घेतले आहे. 
 
याबदल्यात शिवसेनेला नगराध्यक्षपद तर काँग्रेसला उपनगराध्यक्षपद मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या दापोली नगरपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेला 7, भाजपाला 2, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या. दापोली नगरपंचायत एकूण 17 सदस्यांची आहे.  

Web Title: Shiv Sena-Congress alliance for power in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.