“संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 08:51 AM2022-05-30T08:51:55+5:302022-05-30T08:53:01+5:30

‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

shiv sena criticised bjp devendra fadnavis over sambhaji raje chhatrapati and raj thackeray issue | “संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...”

“संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...”

googlenewsNext

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी घेतलेली राज्यसभा निवडणुकीतून माघार, संभाजीराजेंनी शिवसेनेवर केलेले आरोप आणि संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेली टीका यामुळे राजकीय वर्तुळात यावरून जोरदार दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यातच आता संभाजीराजे छत्रपती आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कोंडी भाजपनेच केल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप उडी कशी मारली नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता, पण फडणवीस यांनी लोकांची निराशा केली नाही. आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे फडणवीस बोलू लागले आहेत. फडणवीसांची वक्तव्ये आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत. शब्द द्यायचा व नंतर वेळ येताच मोडायचा हे भाजपलाच चांगले जमते. २०१४ आणि २०१९ साली महाराष्ट्रात जे शब्द फिरवण्याचे खेळ झाले, त्याचा अनुभव गाठीशी असलेले फडणवीस इतरांच्या शब्दमोडीवर प्रश्न विचारतात हे आश्चर्यच आहे, या शब्दांत शिवसेनेने फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत भाजपा नेतृत्वाने दिलेला शब्द कसा मोडला हे संपूर्ण देश जाणतो. पंचवीस वर्षांच्या युतीनंतरही शब्द मोडणाऱ्यांनी याबाबत प्रवचने झोडावीत यास काय म्हणायचे! कोंडी झाली म्हणजे काय हे आधी फडणवीस यांनी ‘मराठी शब्दरत्नाकरा’चा अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. २०१९ साली ‘मी पुन्हा येईन’ असे सांगणाऱ्या फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून सुरू झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही, असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून लगावला आहे. 

भाजपनेच सापळ्यात अडकवले

उलटपक्षी संभाजीराजे यांची कोंडी करायला सुरुवात केली ती भाजपानेच. संभाजीराजे फडणवीस यांना भेटले व पाठिंब्यासाठी विनंती केली. तेव्हा ‘आम्ही संभाजीराजांना पाठिंबा देतोच’ असे फडणवीस म्हणाले नाहीत. त्यांनी राजेंना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. ‘विचार करू’, ‘वरच्यांना विचारून निर्णय घेऊ’ अशी थातूरमातूर उत्तरे त्यांनी दिली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी अपक्ष लढू पाहणाऱ्या संभाजीराजेंना भाजपनेच सापळ्यात अडकवले. हा त्यांचा जुनाच धंदा आहे

दरम्यान, राज ठाकरे यांच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली. पुढे त्यांच्या अयोध्या दौऱ्यास उत्तेजन देऊन पुन्हा आपल्याच खासदाराकडून जोरदार विरोध करायला लावला व एकप्रकारे मोठी कोंडीच निर्माण केली. हाच त्यांचा राजकीय पॅटर्न असतो. शिवसेना असे कधीच करत नाही. जे करायचे ते समोर, बोलायचे तोंडावर. त्यामुळे सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंची कोंडी केली हे फडणवीसांचे वक्तव्य फसले आहे, असा दावाही सामना अग्रलेखातून शिवसेनेने केला आहे. 
 

Web Title: shiv sena criticised bjp devendra fadnavis over sambhaji raje chhatrapati and raj thackeray issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.