मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना अंधारात
By admin | Published: July 5, 2016 01:03 AM2016-07-05T01:03:13+5:302016-07-05T01:03:13+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर आलेला असतानादेखील शिवसेनेला अद्याप विचारात घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर आलेला असतानादेखील शिवसेनेला अद्याप विचारात घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेने लक्ष्य केल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, आम्ही मंत्रिपदासाठी कोणाच्या
दारात जाऊन उभे राहणार नाही.सन्मानाने बोलविले तर बघू, लाचारी पत्करणार नाही. आधी ते शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद देऊ म्हणाले. नंतर राज्यमंत्रीपदावर (स्वतंत्र कार्यभार) आले. अलिकडे तर कोणीही माझ्याशी चर्चा केलेली नाही. शिवसेनेचे अनंत गिते हे
केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत. मध्यंतरी पक्षाचे राज्यसभा सदस्य अनिल
देसाई यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा होती. उद्याच्या विस्ताराबाबत भाजपाच्या नेतृत्वाकडून कोणीही रात्री उशिरापर्यंत शिवसेना नेतृत्वाशी चर्चा केलेली नव्हती. शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत म्हणाले की, मुळात हा भाजपाचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. त्यात शिवसेना, अकाली दल
आणि तेलगू देसम या प्रमुख मित्र पक्षांना स्थान नसेल. त्यामुळे शिवसेनेला डावलून विस्तार
केला जातोय हे म्हणणे योग्य
ठरणार नाही. रामदास आठवले हे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले आहेत आणि अनुप्रिया पटेल यांनीत्यांचा पक्ष भाजपात विलिन केलेला आहे. (विशेष प्रतिनिधी)