औरंगाबादमधील शिवसेनेचा वाद विकोपाला; अब्दुल सत्तारांबाबत चंद्रकात खैरे करणार गौप्यस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:11 PM2020-01-04T15:11:14+5:302020-01-04T15:12:18+5:30

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग तीन वर्षापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेत घडला होता.

Shiv Sena dispute resolved in Aurangabad; Chandrakant Khaire talk About Abdul Sattar later | औरंगाबादमधील शिवसेनेचा वाद विकोपाला; अब्दुल सत्तारांबाबत चंद्रकात खैरे करणार गौप्यस्फोट?

औरंगाबादमधील शिवसेनेचा वाद विकोपाला; अब्दुल सत्तारांबाबत चंद्रकात खैरे करणार गौप्यस्फोट?

googlenewsNext

औरंगाबाद - शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी राज्यमंत्रिपद दिल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याची बातमी आहे. मात्र औरंगाबद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिवसेनेचा वाद विकोपाला गेल्याचं समोर आलं आहे. 

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे ७ आमदार अन् सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य असताना अध्यक्षपद काँग्रेसला देण्यावरुन सत्तार नाराज झालेत. मात्र शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र सत्तारांच्या राजीनाम्यावर भाष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सत्तारांनी राजीनामा दिला की नाही याची कल्पना नाही. महाविकास आघाडी झाल्यानेच अब्दुल सत्तार मंत्री झाले. त्यामुळे महाविकास आघाडी राज्याचा विचार करुन झाली आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत माझ्यासोबत अब्दुल सत्तार काय बोलले हे सांगेन, ते भयानक आहे. मी कोणाची पर्वा करत नाही, मी संघटनेचं काम करतो, आमच्या नेत्याबाबतीत कोणी काय बोललं तर सहन करत नाही असं सांगत चंद्रकांत खैरे यांनी सत्तारांबाबत काय वाद झाला याबाबत सस्पेन्स ठेवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर आल्याचं बोललं जातं आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग तीन वर्षापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेत घडला होता. शिवसेना व काँग्रेसने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता आणली होती. त्यावेळी ठरलेल्या सत्ता समीकरणानुसार अडीच वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचा शब्द शिवसेनेने पाळला. मात्र, शिवसेनेच्या विद्यमान जि.प. अध्यक्ष अ‍ॅड. देवयाणी डोणगावकर यांची बंडखोरी आणि शिवसेनेचेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘मातोश्री’चा आदेश धुडकावत शिवसेनेची नाचक्की केल्याचे चित्र उमटले, तसेच जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेही शिवसेनेच्या बंडखोरासाठी शरणागती पत्करणे पसंत केले. भाजपने उमेदवार उभा केलेला असताना शिवसेना बंडखोराला मतदान करण्याचा निर्णय घेतला. सत्तार यांनी काँग्रेसला अध्यक्षपद मिळू द्यायचे नसल्यामुळे त्यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याचे बोलले जाते. कृष्णा पाटील डोणगावकर यांनी विधानसभेच्या वेळी भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांना सहकार्य केल्यामुळे त्यांनी त्याची परफेड म्हणून अध्यक्षपदासाठी भाजपचे सहकार्य दिले. 
 

 

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही; खोतकरांचा दावा, उद्या घेणार उद्धव ठाकरेंची भेट 

आघाडीला दुसरा धक्का; काँग्रेस आमदार गोरंट्यालही राजीनाम्याच्या तयारीत

आज अशा बऱ्याच बातम्या मिळतील; अब्दुल सत्तार राजीनाम्यानंतर चंद्रकांतदादांचा चिमटा

...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... 

Web Title: Shiv Sena dispute resolved in Aurangabad; Chandrakant Khaire talk About Abdul Sattar later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.