...तर बाळ ठाकरे महाराष्ट्र विकतील; चंद्रकांत खैरेंनी सांगितली संजय शिरसाटांची 'ती' आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:12 PM2022-08-13T13:12:10+5:302022-08-13T13:23:56+5:30

संजय शिरसाट यांनी आधीही शिवसेना सोडून काँग्रेससोबत गेले होते. बराच काळ त्यांचा बंडखोरीत गेला असं खैरे म्हणाले.

Shiv Sena Ex MP Chandrakant Khaire Criticized Eknath Shinde Rebel Group Mla Sanjay Shirsat | ...तर बाळ ठाकरे महाराष्ट्र विकतील; चंद्रकांत खैरेंनी सांगितली संजय शिरसाटांची 'ती' आठवण

...तर बाळ ठाकरे महाराष्ट्र विकतील; चंद्रकांत खैरेंनी सांगितली संजय शिरसाटांची 'ती' आठवण

googlenewsNext

औरंगाबाद - शिंदे गटातील आमदारांमध्ये उकळ्या फुटायला लागल्या आहेत. संघर्ष वाढणार आहे. ते शिवसेनेच्या पथ्याशी पडणार आहेत. आमचे कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत परंतु त्यांचे कुटुंबप्रमुख दुसरे झालेत. संजय शिरसाटवर जास्त भरवसा करता येणार नाही. मतदार नाराज आहेत. या नाराजीचा फटका काही दिवसांनी दिसून येईल. रात्री ट्विट का करतात ते सगळ्यांना माहिती आहे असा टोला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांना लगावला. 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, संजय शिरसाट यांनी आधीही शिवसेना सोडून काँग्रेससोबत गेले होते. बराच काळ त्यांचा बंडखोरीत गेला. त्यानंतर दिवाकर रावतेंजवळ जाऊन त्यांनी शिवसेनेत येण्यासाठी मागे लागले होते. जर बाळ ठाकरेंना सत्ता दिली तर महाराष्ट्र विकतील, भगवा भानामतीचं भूत आहे असं शिरसाट यांनी वक्तव्य केले होते. तरीही बाळासाहेबांनी त्यांना माफ केले होते. याची जाणीव शिरसाट यांना नाही. रात्री ट्विट केल्यानंतर ये काय बोलला रे तू असा दबाव आल्यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केले असा टोला त्यांनी लगावला. 

त्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश काढत अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. आम्ही कडवट शिवसैनिक आहोत. आदेश आल्यानंतर ते पाळणारे आम्ही आहोत. दानवे यांच्या माध्यमातून विविध प्रश्न विधान परिषदेत मांडू. डुप्लिकेट आघाडी राज्यात निर्माण झाली आहे. तो माझा शिष्य आहेत. चांगले काम करेल. आम्ही दोघं एकत्र आलो असलो तर समोर गद्दार राहणार नाहीत असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. 

संघर्ष पेलायला आम्ही तयार
चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात पुन्हा शिवसेना उभी राहील. मोठं आव्हान असल्यावर काम करायला मज्जा येते. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. संघर्ष पेलायला आम्ही तयार आहोत. शिवसेना पुन्हा उच्च स्तरावर नेऊन ठेऊ असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. औरंगाबाद येथे त्यांनी खैरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलत होते. 

Web Title: Shiv Sena Ex MP Chandrakant Khaire Criticized Eknath Shinde Rebel Group Mla Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.