गणेश नाईकांच्या खांद्यावरुन शिवसेनेवर गोळीबार, भाजपाचा राजकीय प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 04:40 PM2019-09-14T16:40:04+5:302019-09-14T21:42:30+5:30
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई खालोखाल दरडोई उत्पन्न असणारा आणि देशातील सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण झालेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहीले जाते.
एकेकाळी शिवसेनेत असलेले व दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता भाजपत प्रवेश केलेले गणेश नाईक यांच्या पक्षप्रवेशाने ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. येथील शिवसेना या मित्रपक्षाचे वर्चस्व संपुष्टात आणण्याकरिता नाईक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप चाप ओढणार आहे. अर्थात या बदल्यात नाईक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे राजकीय पुनर्वसन करणे ही गरज आहे. मात्र, तेही तितके सोपे नाही.
नारायण जाधव
मुंबई - राष्ट्रवादीचे नवी मुंबईच नव्हेत तर ठाणे जिल्ह्यातील मातब्बर नेते गणेश नाईक यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाईक यांच्यासमवेत नवी मुंबई महापालिकेतील 42 नगरसेवकही भाजपत आल्याने निवडणूक न लढताच राज्यातील आणखी एक महत्त्वाची महापालिका भाजपच्या ताब्यात आली. शिवाय गणेश नाईक यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या दादागिरीला मोडून काढणारा मोठा नेता भाजपला मिळाला आहे. यामुळे येत्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत. किंबहुना भाजपकरिता कठीण असलेल्या ठाणे जिल्ह्यात पक्षाला ‘अच्छे दिन’ पाहण्याची संधी मिळाली आहे.
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई खालोखाल दरडोई उत्पन्न असणारा आणि देशातील सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण झालेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहीले जाते. या जिल्ह्यात सात महापालिका, दोन नगरपालिका आठ ते दहा एमआयडीसी आहेत. शिवाय सत्तासोपानासाठी आवश्यक संख्याबळ गाठण्यासाठी विधानसभेच्या 18 जागा आहेत. नजिकच्या पालघर जिल्ह्यातील आठ आणि रायगड जिल्ह्यातील आठ जागा महत्त्वाच्या आहेत. सध्या यापैकी शिवसेनेकडे 6 आणि भाजपकडे सहयोगी सदस्य धरून आठ जागा असून चार राष्ट्रवादीचे आमदार होते. यापैकी नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी आधीच राजीनामा देऊन कमळ हाती घेतले आहे. तसेच शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुंरग बरोरा हे शिवसेनावासी झाले आहेत. सध्या मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी हेच राष्ट्रवादीत आहेत. परंतु, आव्हाड सोडले तर सध्या राष्ट्रवादीकडे मातब्बर चेहरा नाही. काँग्रेसची शकले झाली आहेत.
शिवसेनेच्या ताब्यात सध्या ठाणो, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या तीन महापालिकांसह अंबरनाथ-बदलापूर या नगरपालिका आहेत. भिवंडीत काँग्रेससोबत ती सत्तेत आहे. मात्र, केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपची सत्ता यापैकी कुठेच नाही. परंतु, आता नाईकांच्या रुपाने नवी मुंबईसारखी महत्त्वाची महापालिका निवडणूक न लढवताही भाजपकडे येणार आहे. शिवाय ठाणो जिल्ह्यासह पालघर आणि रायगडच्या उरण-पनवेल आणि कजर्त खालापूर परिसरात नाईक यांचे अनेक समर्थक आहेत. यामुळे त्याठिकाणीही अप्रत्यक्ष का होईना भाजपला नाईकांच्या ताकदीचा फायदा घेता येणार आहे. ठाणो जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरचे कलानी कुटुंब, वसई-विरारचे ठाकूर कुटुंबाशी त्यांची जवळीक आहे. युनियनमुळे ते डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड, रसायनी, पाताळगंगा, बोईसर, तारापूर्पयत आधीच लोकप्रिय होते. त्याचाही लाभ जसा शिवसेना आणि राष्ट्रवादीला झाला तसा आता भाजपला होऊ शकतो. पुढच्या महापालिका निवडणुकीत नवी मुंबई प्रमाणोच ठाणो आणि कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेत कमळ फुलू शकते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्या काळात जनसंघ जसा जिल्ह्यात फोफावला होता. तसा तो पुन्हा फोफावण्याची संधी आहे. यातून आनंद दिघे यांनी संपवलेली जनसंघाची पाळेमुळे आता पुन्हा ठाणो जिल्ह्यात मूळ धरू शकतात. मात्र, भाजप त्यांना कितपत स्वातंत्र्य देते, अन् गणोश नाईकही आपल्या काही तत्त्वांना, घराणोशाहीला कितपत मुरड घालतात, यावर त्यांचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
* कामगार नेता ते धीरूभाई अंबानीचा मित्र
80 च्या दशकात एक साधा कामगार नेता, राज्याचा माजीमंत्री आणि गेली अडीच दशके नवी मुंबईसारखी महत्त्वाची महापालिका स्वत:च्या हिमतींवर नाईक यांनी आपल्या ताब्यात ठेवली आहे. यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येईल. नाही म्हणायला 1985 व 1995 आणि 2014 साली झालेले निसटते पराभव त्यांनी पचवले आहेत. शिवाय त्यांनी बेलापूर येथील ग्लास हाऊसच्या नावाखाली बळकावलेला सिडकोचा भूखंड आणि एमआयडीसीत बावखळेश्वर मंदिराच्या नावाखाली विस्तीर्ण जमिनीवर केलेले अतिक्रमण हे नाईकांवर उडालेले शिंतोडे आहेत. तसेच कळवा-बेलापूर बँकेच्या कथित घोटाळ्य़ाचेही त्यांच्यावर आरोप झाले आहेत.
शिवसेनेनंतर भारत विकास पक्ष, मग शिवशक्ती सामाजिक संघटना ते राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 2014 च्या निसटत्या पराभवानंतर ते शांतच राहीले. ठाणो जिल्ह्यातील एक सहिष्णू नेता अशी त्यांची ओळख आहे. धीरुभाई अंबानींसारखे उद्योजक, निरंजन हिरानंदानीं सारखे बिल्डर, अनेक जैनमुनी आणि स्व. वामनराव पै, बालयोगी सदानंद महाराज अशा वेगवेगळ्य़ा क्षेत्रातील लोकांबरोबरच अनेकविध धार्मिक महापुरुषांकडे नाईक यांची उठबस राहिली आहे.
* एक कोटींच्या देणगीमुळे मुख्यमंत्रीपद हुकले
गणोश नाईक यांचा आजर्पयत प्रवास मोठा रंजक राहीला आहे. ऐंशीच्या दशकात ठाणो-बेलापूर औद्योगिक पट्टय़ात येणा:या विविध कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी ते झगडत होते. त्यातूनच ते शिवसेनेकडे आकर्षिले गेले. पुढे त्यांनी श्रमिक सेना या कामगार संघटनेची पाळेमुळे सर्वदूर रोवली. 350 पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये श्रमिक सेनेचा भगवा फडकला. यात रायगड जिल्ह्यातील रिलायन्ससारख्या कंपनीचाही समावेश आहे. यामुळे ते धीरूभाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या अधिक जवळ गेले. यात त्यांना स्व. साबीरभाई शेख यांचीही साथ मिळाली. कामगार नेते म्हणून त्यांच्यावर स्व. बाळासाहेबांची नजर पडली. ते बाळासाहेबांचे लाडके सैनिक झाले. मात्र, 90 ते 95 दरम्यान शिवसेना भवनातील एका बैठकीत बाळासाहेबांनी पक्ष चालवण्यासाठी पक्ष निधीची गरज बोलून दाखवली. तेव्हा पुढे बसलेल्या आणि विधिमंडळ, मुंबई महापालिकेत महत्त्वाची पदे भूषविलेल्या मनोहर जोशी, छगन भुजबळ, स्व.प्रमोद नवलकर यांच्यासारख्या नेत्यांनी एक ते पाच लाखांची रक्कम देऊ केली. त्यावेळी मागे बसलेल्या आमदार गणोश नाईकांनी डायरेक्ट एक कोटींची रक्कम सांगितल्यामुळे सा:यांच्याच भुवया उंचावल्या. नाईकांविरोधात मोहीम राबवण्याची मुहूर्तमेठ त्याचवेळी रोवली गेली. मात्र, त्याची तमा न बाळगता नाईकांनी आपल्या युनियनच्या माध्यमातून एक कोटी रुपये शिवसेनेला गोळा करून दिले. एवढेच नव्हे तर बाळासाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 60 रुग्णहिका वाटण्याचा संकल्प सोडून पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध भागात देण्यासाठी 44 रुग्णवाहिकांचे लोकार्पण बाळासाहेबांच्या हस्ते केले. 1992-93 च्या दंगलीत मुंबईत जळत असतांना तिची जुळी बहिण समजली जाणारी नवी मुंबई मात्र शांत होती. इकडे अनेक मुस्लिम बांधव बिनधास्तपणो रस्त्यांवर नमाज पढत होते. याचे श्रेय गणोश नाईकांनाच जाते. यामुळे ठाण्यातील एका शिवसेना नेत्यांने त्याकाळी त्यांना बांगडय़ांचा आहेर पाठविल्याची वंदता आहे. मात्र, भिवंडी, राबोडी, मुंब्रासारख्या मुस्लिमबहुल पट्टय़ातही नाईक लोकप्रिय झाले. यानंतर मात्र, शिवसेनेतील ज्येष्ठांकडून त्यांची नाकेबंदी सुरू झाली. बाळासाहेबांचे कान फुंकण्यात ही मंडळी आघाडीवर होती. याच दरम्यान शिवसेनेत मोठी फूट पडली.
छगन भुजबळ काही ओबीसी आमदारांना घेऊन बाहेर पडले. मात्र, ओबीसी असलेल्या गणोश नाईकांनी बाळासाहेबांवरील श्रद्धेपोटी शिवसेनेतच राहणो पसंत केले. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांची गटनेता म्हणून निवड केली. ही बाब बाळासाहेबांच्या अवतीभोवती फिरणा:या नेत्यांना खटकली. त्यांनी गणोश नाईकांविरोधात कान भरण्याची मोहीम तीव्र केली. 1995 साली युतीची सत्ता आली तेंव्हा गटनेते असलेल्या नाईकांकडे नेतृत्व येईल, असे वाटले होते. मात्र, कान भरणा:यांचा हेतू साध्य झाला. नाईकांकडे नेतृत्व सोडाच परंतु, त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश झाला नाही. नंतर त्यांना वनमंत्री हे दु्य्यम खाते देण्यात आले. मात्र, तो अपमान नाईक यांनी पचवला. परंतु, त्यांच्याविरोधकांचे समाधान झाले नव्हते. महापालिकेत सत्ता असून त्यांची कोंडी होऊ लागली. त्यांना बाळासाहेबांनी राजीनामा देण्यास सांगितले. तेंव्हा मात्र नाईकांच्या संयमांचा बांध फुटून त्यांनी थेट माझी चूक काय आहे ते आधी सांगा मगच राजीनामा देतो, असे थेट आव्हान बाळासाहेबांना दिले. बाळासाहेबांना असे आव्हान पहिल्यांदाच कुणी तरी दिले होते. यामुळे त्यांची मंत्रिमंडळाकडून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हकालपट्टी केली. हीच संधी साधून चाणाक्ष शरद पवार यांनी गणोश नाईकांना सन्मानाने राष्ट्रवादीत बोलावले. तेव्हापासून त्यांनी राज्यमंत्रिमंडळात वने, पर्यावरण, कामगार, उत्पादन शुल्क अशी अनेक खाती सांभाळली. या काळात राष्ट्रवादी पक्षाला सर्वाधिक निधी देणारा नेता म्हणून ओळख जपली. मात्र, तरीही त्यांचे ‘मातोश्री’सह सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबध राहीले आहेत. मोदी लाटेत 2014 साली त्यांचा बेलापूर मतदारसंघातून पराभव झाला. तेंव्हापासून ते विजनवासात गेले होते.
* प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरून नाईकांना घेरण्याचा प्रश्न
भाजप प्रवेशावेळी 15 वर्षे सत्तेत राहून आपणास नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न सोडवता आला नसल्याची खंत व्यक्त केली. त्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे गणोश नाईकांनी सांगितले. त्यांच्या कबुलीजबाबाला पकडून विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. मंदा म्हात्रे या केवळ पाच वर्षे बेलापूरच्या आमदार असतांनाही त्यांनी हा विषय लावून धरला असून त्यांना प्रॉपर्टीकार्ड वाटपात यश मिळवले आहे. शिवाय त्यांच्या घरांचा सव्र्हे सुरू केला असून बेलापूर येथील गावठाणात क्लस्टरद्वारे विकासाला हिरवा कंदिला मिळवला आहे. यामुळे जे काम मंदा म्हात्रेंनी पाच वर्षात करून दाखविले ते नाईकांना मंत्री असूनही का जमले नाही, असा प्रचार आता भाजपच्या जुन्या कार्यकत्र्यानी सुरू केला आहे. शिवसेनेने झोपडपट्टी पुनर्वसन, फोटोपास आणि दगडखाणींच्या विषयावरून नाईकांना घेरण्याची रणनिती सुरू केली आहे. नवी मुंबईत 42 झोपडपट्टीत लाखो रहिवासी राहत असून दगडखाण कामगारही याच पट्टय़ातला आहे. यामुळे येथील मतदारांना आपलेसे करण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना घेरण्यास सुरूवात केली आहे.
* आता भाजपसमोर ऐरोली -बेलापूरच्या उमदेवारीचा पेच
बेलापूर मतदारसंघातून सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यात मरीना, प्रकल्पग्रस्तांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप, त्यांचे प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न त्यांनी लावून धरला आहे. म्हात्रे याही आगरी समाजाच्या असून पक्षाच्या ओबीसी आमदार आहेत. ठाणो जिल्ह्यातील ओबीसी महिला प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. शहरात त्याच राष्ट्रवादीच्या दादागिरीलाच तोंेड देत होत्या. यामुळे त्यांची उमदेवारी डावलून भाजपश्रेष्ठी नाईकांना उमेदवारी देतील काय, तसेच दिली तर मंदाताईंचे पुनर्वसन कसे करतील, हा प्रश्न मंदाताईंच्या कार्यकत्र्याना सतावत आहे. शिवाय शिवसेना हा मित्रपक्ष असून युती झाली तर ऐरोलीची जागा त्यांच्या वाटय़ाला आहे. यामुळे संदीप नाईक यांच्यासाठी शिवसेना जागा सोडेल काय, तिच्या बदल्यात कोणती जागा घेते, हाही एक पेच निर्माण होणार आहे. तसेच बेलापूरमधून शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी गेल्या अनेक दिवसांपासून विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. नाहटा आणि म्हात्रे या दोन्ही नेत्यांनी गेल्या पाच वर्षात नाईकांच्या विरोधात तोंडसुख घेतले आहे हे विशेष. त्यामुळे नाईक यांचा पुढील प्रवासही संघर्षमय व नाटय़पूर्ण घडामोडींचा राहणार आहे.