शिवसेनेच्या वाट्याला तिसऱ्यांदा 'अवजड'; राऊतांना बोलणे झाले जड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 02:04 PM2019-05-31T14:04:15+5:302019-05-31T14:05:51+5:30

उद्वव ठाकरे पंतप्रधानांच्या शपथविधीच्या आदल्या दिवशीच दिल्लीला गेले होते.

Shiv Sena gets third time Heavy Industries and Public Enterprise Ministry | शिवसेनेच्या वाट्याला तिसऱ्यांदा 'अवजड'; राऊतांना बोलणे झाले जड

शिवसेनेच्या वाट्याला तिसऱ्यांदा 'अवजड'; राऊतांना बोलणे झाले जड

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळाची लॉटरी अखेर फुटली असून शिवसेनेला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खातेच देण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी सारवासारव केली आहे. 


उद्वव ठाकरे पंतप्रधानांच्या शपथविधीच्या आदल्या दिवशीच दिल्लीला गेले होते. यावेळी ते रेल्वेमंत्रीपद मागतील तसेच दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे देतील अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे. 


शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना अनंत गीते यांचेच खाते देण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक उपक्रम हेही खाते देण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेच आधीच नाराजी असताना संजय राऊत यांनी सारवासारव करत सार्वजनिक उपक्रम हेही महत्त्वाचे खाते असल्याचे म्हटले आहे. तसेच देशात रोजगार मिळावा, अशी जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. 


केंद्रातील मंत्रिमंडळ वापटपावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची भुमिका मांडतील. सर्व माहिती घेऊन ते बोलतील. कोणाला कोणते मंत्रीपद द्यावे, हा सर्वस्वी पंतप्रधानांचा अधिकार असतो. देशाच्या विकासाचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे आणि त्यात अवजड उद्योग मंत्रालयाचाही महत्त्वाचा वाटा आहे, असे राऊत यांनी सांगितले. 

अखेर मोदींच्या मंत्रिमंडळाची लॉटरी फुटली; अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री

 

Web Title: Shiv Sena gets third time Heavy Industries and Public Enterprise Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.