भाजपाला आत्मचिंतनाची गरज; झारखंड निकालावरुन शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 01:23 PM2019-12-23T13:23:04+5:302019-12-23T13:34:03+5:30

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसल्यानंतर शिवसेनेचं शरसंधान

Shiv Sena hits out at pm narendra modi and amit shah after bjp faces big blow in jharkhand | भाजपाला आत्मचिंतनाची गरज; झारखंड निकालावरुन शिवसेनेचा टोला

भाजपाला आत्मचिंतनाची गरज; झारखंड निकालावरुन शिवसेनेचा टोला

Next

मुंबई: महाराष्ट्रापाठोपाठ आता भाजपानंझारखंडदेखील गमावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण ताकद पणाला लावूनदेखील भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली. त्यामुळे आता त्यांनी याबद्दल आत्मचिंतन करावं, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून राज्य भाजपाच्या हातून जाणार असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे.

झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण ताकद लावली होती. सुधारित नागरिकत्व कायदा आणून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपानं करुन पाहिला. मात्र मोदी-शहांचे प्रयत्न वाया गेले. झारखंडमधील जनतेनं भाजपाला नाकारलं. महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडदेखील भाजपाच्या हातातून निसटलं आहे. भाजपानं याचं आत्मचिंतन करावं, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. 

महाराष्ट्रात मोठा पक्ष ठरुनही सत्तेपासून दूर राहावं लागल्यानंतर आता झारखंडमध्येहीभाजपावर तीच वेळ ओढवली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होत असून भाजपाला सत्ता गमवावी लागणार असल्याची दाट शक्यता आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या भाजपा २८ जागांवर पुढे आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीनं ४२ जागांचा टप्पा गाठला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा २४, काँग्रेस १३, तर राष्ट्रीय जनता दल ५ जागांवर आघाडीवर आहे.  
 

Web Title: Shiv Sena hits out at pm narendra modi and amit shah after bjp faces big blow in jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.