अनिल परबांचा पाय खोलात! तब्बल २६ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; निकटवर्तीय गोत्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 06:58 PM2022-03-17T18:58:48+5:302022-03-17T18:59:26+5:30

दापोली जमीन खरेदी प्रकरणात अनिल परब अडचणीत; परब यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे

shiv sena leader anil parab in trouble Income tax department raids 26 places | अनिल परबांचा पाय खोलात! तब्बल २६ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; निकटवर्तीय गोत्यात

अनिल परबांचा पाय खोलात! तब्बल २६ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; निकटवर्तीय गोत्यात

googlenewsNext

मुंबई: परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागानं परब यांच्याशी संबंधित २६ ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीत आयकर विभागानं छापे टाकले आहेत. दापोली येथील जमीन व्यवहार प्रकरणात आयकर विभागाकडून कारवाई सुरू आहे.

अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम आयकर विभागाच्या रडारवर आहेत. याशिवाय परब यांच्या जवळच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे पडले आहेत. जमीन खरेदी प्रकरणात आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. दापोलीतील जमीन खरेदी, तिथे बांधण्यात आलेलं रिसॉर्ट, त्यासाठी झालेले व्यवहार याचा तपास आयकर विभागाकडून सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?
दापोलीमध्ये २०१७ मध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला. एका व्यक्तीनं १ कोटी रुपये मोजून जमीन खरेदी केली. दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१९ मध्ये जमिनीची नोंदणी करण्यात आली. २०२० मध्ये ही जमीन दुसऱ्या व्यक्तीनं खरेदी केली. या व्यक्तीचं नाव सदानंद कदम आहे. कदम हे परब यांचे निकटवर्तीय असून ते व्यवसायानं केबल ऑपरेटर आहेत. 

२०२० मध्ये सदानंद कदम यांनी १ कोटी १० लाखाला जमीन खरेदी केली. त्यानंतर तिथे रिसॉर्ट बांधण्यात आलं. त्यासाठी ६ कोटी रुपयांचा खर्च आला. ही सगळी रक्कम रोख स्वरुपात खर्च करण्यात आली. रिसॉर्ट बांधताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. या व्यवहारात मूल्यांकन कमी दाखवून कमी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. त्यामुळे सरकारी तिजोरीत कमी महसूल झाला. सरकारची फसवणूक करण्यात आली, असा आयकर विभागाचा आरोप आहे.

'तो' सरकारी अधिकारी कोण?
दापोली जमीन खरेदी प्रकरणात एक सरकारी अधिकारीही आयकर विभागाच्या रडारवर आहे. हा अधिकारी परब यांचा निकटवर्तीय असल्याचं समजतं. आयकर विभागानं त्याचं नाव सांगितलेलं नाही. मात्र त्याच्या मालकीचा एक बंगला, फार्महाऊस असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Web Title: shiv sena leader anil parab in trouble Income tax department raids 26 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.