… घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला, शिलेदारांसाठीही मोठा ट्रॅप; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 12:47 PM2022-05-22T12:47:22+5:302022-05-22T12:47:48+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचं आवाहन मनसैनिकांना केलं.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचं आवाहन मनसैनिकांना केलं. तसंच हे एक आंदोलनच असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार, हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला. @mnsadhikrut@RajThackeray@ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) May 22, 2022
काय म्हणाले राज ठाकरे?
भोंग्यांचं आंदोलन हे एका दिवसाचं आदोलन नाही. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला तपासत असून तुम्ही हे विसरलात की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आत्ता सुरू केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका. मी एक पत्र तुम्हाला देणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की घराघरात ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळी ते रस्त्यावरच केलं पाहिजे असं नाही. पण त्यांचं सहकार्य आवश्यक आहे. तर या गोष्टी बंद होतील, असं राज ठाकरे म्हणाले.
“अयोध्या दौरा रद्द म्हटल्यावर अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. म्हणून मी दोन दिवसांचा बफर दिला होता. जे बोलायचंय ते बोलून घ्या. अयोध्येला जाणार याची घोषणा सुरू केली होती. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. काय चाललंय हे मी पाहत होतं. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून लोक माहिती देत होते. एक वेळ आली तेव्हा मला हा सापळा असल्याचं लक्षात आलं. यात अडकलं नाही पाहिजे असं वाटलं. या सगळ्याची सुरूवात रसद पुरवली गेली ती महाराष्ट्रातून झाली. हा पुन्हा विषय बाहेर काढा असं सांगण्यात आलं. माझी अयोध्या वारी खुपली असे बरेच जण होते” असं राज ठाकरे म्हणाले.