Gulabrao Patil : "या चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धवसाहेबांना बावरट केलं"; गुलाबराव पाटील भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:51 PM2022-07-04T14:51:59+5:302022-07-04T14:52:32+5:30

ज्यांची लायकी नाही ते आमच्यावर बोलतात आमची मतं घेऊन खासदार होतात. याच डुकरांची मतं घेऊन निवडून येतात, गुलाबराव पाटलांचा निशाणा.

shiv sena leader gulabrao patil targets leaders maharashtra floor test sanjay raut uddahv thackeray | Gulabrao Patil : "या चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धवसाहेबांना बावरट केलं"; गुलाबराव पाटील भडकले

Gulabrao Patil : "या चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धवसाहेबांना बावरट केलं"; गुलाबराव पाटील भडकले

googlenewsNext

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. “आमच्यावर बरीच टीका करण्यात आली. बंडखोरी केल्याचं म्हटलं. आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केलाय. आम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी फारक घेऊ नये म्हणून या विचारावर पुन्हा आलो आहोत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले. विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.

“माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरूभाई अंबानी सुद्धा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचे हा इतिहास आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण बाळासाहेबांनी केलं. अनेकांना त्यांनी पुढे आणलं. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दीघेंच्या आशीर्वादानं आम्ही आज आमदार झालो,” असं गुलाबराव पाटील म्हणाले. ५५ आमदारांमधून ४० आमदार कसे फुटतात? आपला साधा मेंबर जरी फुटला त्याची विचारपूस आम्ही करतो. ४० आमदार फुटतात ही आजची गोष्ट नाही. बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दुख देण्याची इच्छा नाहीये, असंही त्यांनी नमूद केलं. 

चहापेक्षा किटली गरम असा प्रकार होता
अनेकदा आमदार व्यथा मांडायला जायचे, पण चहापेक्षा किटली गरम असा प्रकार होता. आम्ही सहज आमदार झालो नाही. भगवा झेंडा हाती घेऊन इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. या दोन वर्षांत कोरोना आला. एकनाथ शिंदेंनी प्रत्येक आमदाराला बोलावून रेमडेसिवीर वाटायचेत?, धान्य वाटायचंय?, दवाखान्यातलं काम आहे का विचारलं हे आम्ही लक्षात ठेवणार नाही. आम्हाला माहित होतं शिवसेना संपणार आहे. भास्कर जाधवांनी काळजी करू नये ही शिवसेना संपणार नाही, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना उभी ठेवणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्हाला गद्दार, गटाराचं पाणी, डुक्कर, तुमची प्रेतं बाहेर येतील, वरळीवरून जाऊ शकत नाही असं म्हटलं. धमकी द्यायचा धंदा आमचाही आहे. लेचेपेचे म्हणून आमदार झालो नाही. मनगटात जोर असलेला माणूस मैदानात येतो आणि सत्तेत सामील होतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 

शिवसेना वाचवण्याची जबाबदारी आमची
शिवसेना जर संपत असेल तर वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आम्ही २० आमदार होतो. शिंदे गेल्यावर आम्ही २० आमदार त्यांच्याकडे गेलो. आम्ही सांगितलं समजून घ्या, त्यांनी सांगितलं तुम्हाला जायचं तर तुम्हीही जा म्हटलं, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. युती कायम व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमदारांची नाराजी आम्ही सांगितली, पण फोन कोणी उचलत नाही. अजित पवारांचा मला हेवा वाटायचा. विरोधीपक्षाचे आहे का सत्तेचे हे पाहणार नाही. कार्यकर्त्याला काय लागतं?, एखाद्या मंत्र्याकडे गेलो तर एक मंत्री असा आहे, फोटो सोडा, आम्ही या देशातलेच नाही, जसं काही उधारीच मागायला आलोय, अशा प्रकारे काम चालणार असेल तर कोण थांबणार असा सवालही गुलाबराव पाटील यांनी केला.

... तरी आम्हाला किंमत नाही
आम्ही सत्तेतून दूर पळतोय तरी आम्हाला किंमत नाही. बंडखोर, आगाऊ आहोत म्हटलं जातं. तुम्ही आम्हाला मातोश्रीत या म्हणायला हवं होतं. चार लोकांच्या कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं. ज्यांची लायकी नाही ते आमच्यावर बोलतात आमची मतं घेऊन खासदार होतात. याच डुकरांची मतं घेऊन निवडून येतात. काय शब्द वापरतात, हे कोण सहन करणार? असा सवालही त्यांनी केला.

Web Title: shiv sena leader gulabrao patil targets leaders maharashtra floor test sanjay raut uddahv thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.