आई, वडीलांना शिव्या दिलेल्या चालतील...; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 04:08 PM2022-10-07T16:08:44+5:302022-10-07T16:09:59+5:30

भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत मोठे विधान केले.

Shiv Sena leader Manisha Kayande criticized BJP leader Chandrakant Patil and the Shinde group | आई, वडीलांना शिव्या दिलेल्या चालतील...; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा हल्लाबोल

आई, वडीलांना शिव्या दिलेल्या चालतील...; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई: भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत मोठे विधान केले."आई, वडीलांना शिव्या द्या ते चालेल, पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शिव्या दिलेल्या मला चालणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. 

"माझ्या आई, वडीलांना शिव्या द्या त्या चालतील पण मोदी आणि शाह यांना देऊ नका, हेच का यांचे हिंदुत्व, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली. हिंदुत्वाच्या नावाने शिंदे गट भाजपसोबत गेला हे खोटं आहे. सत्तेसाठी ही लोक भाजपसोबत गेली आहेत. चंद्रकात पाटील यांनी काल केलेल्या वक्तव्यावरुन हे समजत आहे, असंही शिवसेना नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या.  

चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटातील नेत्याने दिले प्रत्युत्तर

दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. या दाव्याला आज शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. 

आम्ही अशा पद्धतीचे कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते. हा आमचा उत्स्फुर्त उठाव होता. आमचा हा उठाव काही तत्वांसाठी होता. आमचं या संदर्भात अगोदर कोणतही प्लॅनिंग नव्हते, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.

भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल काल पुण्यात पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेतील काही किस्से सांगितले. 

Web Title: Shiv Sena leader Manisha Kayande criticized BJP leader Chandrakant Patil and the Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.