साडेतीन शक्तीपीठांची ज्योत घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले, पण...; नीलम गोऱ्हेंचा आरोप काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 01:47 PM2023-10-25T13:47:59+5:302023-10-25T13:48:35+5:30
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातून जो फंड पीएम केअर फंडाला गेला त्याची चौकशी ते करू शकले असते असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मुंबई – ठाकरे गटाकडे अतिशय कोंदटपणाचे वातावरण होते, कोणीतरी कोणाला जाऊन रिपोर्ट करायचे. काहीतरी सांगायचे. गेल्यावर्षी मी साडेतीन शक्तीपीठांच्या ज्योती घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले होते. पण मला वारंवार सांगितले की साहेबांना या ज्योती दिसताही कामा नये. शेवटी मी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील स्मारकाजवळ त्या ज्योती ठेवल्या असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मी बाळासाहेबांच्या स्मारकावर ज्योती ठेवल्या तिथे देखील उद्धव ठाकरेंनी येऊन नमस्कार केला नाही. पण नियतीचा न्याय असा की उद्धव ठाकरेंनाच ती ज्योत मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना सांभाळण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केले. आम्ही ज्या शिवसेनेत होतो, त्याच शिवसेनेत आज आहोत. झेंडा तोच आहे, गळ्यातील उपरणेही तेच आहे. धनुष्यबाणही तोच आहे असंही त्यांनी म्हटलं.
तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातून जो फंड पीएम केअर फंडाला गेला त्याची चौकशी ते करू शकले असते. या निधीचे काय झाले याची चौकशी करण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता परंतु ते त्यांनी केले नाही. परंतु आता ते मोदींच्या चौकशीला चौकशी अशी भूमिका मांडतायेत. ५० कोटी रुपये उद्धव ठाकरेंच्या एका पत्रावर एकनाथ शिंदेंनी देऊन टाकले. तेव्हा एक प्रश्न मनात आला, हे जर उलटे असते आणि अशा परिस्थितीत ठाकरेंनी पैसे दिले असते का हा प्रश्न आला असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोवर ते शक्य नाही अशाप्रकारे निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. महिला आरक्षण, जी२० पासून मुंबईच्या स्वच्छतेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काम सांगितले. इथं आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी हा संवाद होता. गेल्या ४-५ वर्षापासून मी उद्धव ठाकरे गटात हवं की नको अशी भावना निर्माण झाल्याचा आरोपही नीलम गोऱ्हेंनी केला.