मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग होता; प्रयत्न झाले, पण... - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 11:15 AM2022-07-02T11:15:16+5:302022-07-02T11:21:22+5:30

प्राण जाए पर वचन ना जाए हे आम्हाला बाळासाहेबांनी आणि हिंदुत्वानं शिकवलं आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य.

shiv sena leader sanjay raut clarifies maharashtra political condition government ed inquiry guwahati | मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग होता; प्रयत्न झाले, पण... - संजय राऊत

मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग होता; प्रयत्न झाले, पण... - संजय राऊत

Next

राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. फडणवीसांना खरंतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री असं म्हणणं सोपं आहे. पण मला त्यांना अजूनही उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जात आहे. पक्षाचा आदेश पाळण्याची संघाची परंपरा आहे. त्यामुळे फडणवीसांनी आदेशाचं पालन केलं त्याबाबत त्यांचं कौतुक करायला हवं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. 

“आपला जो अंतरात्मा असतो तो सांगतो, तू काही केलं नाही, निर्भयपणे चौकशी यंत्रणांना सामोरे गेले पाहिजे. त्याच आत्मविश्वासानं मी गेलो आणि १० तासांनी बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. प्रयत्न झाले, आम्ही नाही गेलो. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यासोबत राहिलो,” असं राऊत म्हणाले.

 
स्वाभिमानाच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि असं करायचं हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाए पर वचन ना जाए हे आम्हाला बाळासाहेबांनी आणि हिंदुत्वानं शिकवलं आहे. मी याबाबतीत निडर आहे. सत्य तुमच्या बाजूनं असेल तर घाबरायचं कारण नाही. मी काल अधिकाऱ्यांना सांगितलं मी बॅग भरून आलो. मी घाबरणार नाही. तुम्हाला हवे ते प्रश्न विचारा. तुम्ही तुमचं कर्तव्य करा मी माझं करतो. अशा प्रकारे कालचा दिवसही गेल्याचं ते म्हणाले.

Read in English

Web Title: shiv sena leader sanjay raut clarifies maharashtra political condition government ed inquiry guwahati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.