“शिवसैनिक आज आनंदी झाला असेल,” राऊतांवरील कारवाईवरून शिंदे गटातील आमदाराची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 10:09 AM2022-07-31T10:09:43+5:302022-07-31T10:10:31+5:30

"शरद पवारांच्या नादी लागून यांनीच शिवसेनेचं वाटोळं केलं आहे," संजय राऊतांवर आमदाराचा हल्लाबोल.

shiv sena leader sanjay raut ed possibility to arrest said eknath shinde supporter sanjay sirsat | “शिवसैनिक आज आनंदी झाला असेल,” राऊतांवरील कारवाईवरून शिंदे गटातील आमदाराची पहिली प्रतिक्रिया

“शिवसैनिक आज आनंदी झाला असेल,” राऊतांवरील कारवाईवरून शिंदे गटातील आमदाराची पहिली प्रतिक्रिया

googlenewsNext

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती आणि चौकशी सुरू आहे. दरम्यान, शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना अटक झाली तर शिवसैनिक खुशच होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“ईडीची एवढीमोठी धाड पडते तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, महाराष्ट्राला त्रास झालाय, शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आज आनंदी आहेत, शिवसैनिक आनंदी आहेत. ते काही मास लीडर नाही, प्रवक्ते आहेत. त्यामुळे काही मोठा उठाव होईल असं वगैरे वाटत नाही,” असं शिरसाट म्हणाले.

“त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये. बाळासाहेबांची शपथ घेण्याइतके ते मोठे नाहीत. तो अधिकार आम्हाला आहे. आम्ही शिवसेनेत ४० वर्षे काढली. नोकरी करता करता नेते होण्याइतकं सोपं नाही. त्याची जाणीव आता त्यांना होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.

'बाहेरचा रस्ता दाखवतील…'
एक दिवस उद्धव ठाकरेच यांना बाहेरचा रस्ता दाखवतील तेव्हा यांना यांची जागा कळेल. शरद पवारांच्या नादी लागून यांनीच वाटोळं केलं आहे. त्यांनी प्रत्येक वेळी यांनीच अनेक कारणं दाखवून आपण राष्ट्रवादीसोबत कसं असायला पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचंच हे कारण हे. सर्वजण फुटले त्याचं कारणचं संजय राऊत असल्याचं शिरसाट म्हणाले.

Web Title: shiv sena leader sanjay raut ed possibility to arrest said eknath shinde supporter sanjay sirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.