उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:28 PM2020-08-03T18:28:15+5:302020-08-03T19:01:39+5:30

अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला.

Shiv sena leader sanjay raut hints cm uddhav thackeray will not join ram mandir bhoomi pujan Program ayodhya | उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

Next
ठळक मुद्देअयोध्येत बुधवारी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.राऊत म्हणाले, जेथे हा समारंभ होत आहे, तेथे कमित कमी लोकांनी जायला हवे.

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 5 ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार का? यावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. मात्र आता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी दिले. राऊत भूमिपूजन कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत पत्रकारांना म्हणाले, पंतप्रधान तेथे जात आहेत, हे अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यमंत्री केव्हाही तेथे जाऊ शकतात.

अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला. तसेच पक्षाने राम मंदिर उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही दिला असल्याचे ते म्हणाले.

राऊत म्हणाले, ''अयोध्या आणि जवळपासच्या भागांत कोरोना व्हायरस चिंतेचा विषय आहे. उत्तर प्रदेशच्या मंत्री कमल रानी वरुण यांचा कोरोनाने मृत्यू झाला असून तीन मंत्री संक्रमित आहेत. माझे असे मत आहे, की जेथे हा समारंभ होत आहे, तेथे कमित कमी लोकांनी जायला हवे. पंतप्रधान तेथे जात आहेत ही मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्री ठाकरे केव्हाही तेथे जाऊ शकतात.''

उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले नाही का? असे विचारले असता, राऊत म्हणाले, कुणीही आमंत्रणाची वाट पाहत नाहीय. मंदिराचे पुजारी आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. शिवसेना या मुद्द्याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही. अयोध्येतील स्थिती गंभीर आहे आणि आपण तेथे कोण जात आहे, असा प्रश्न विचारत आहात. तेथे शक्य तेवढ्या कमी लोकांनी जायला हवे. आम्ही तेथे नंतर जाऊ.

राऊत म्हणाले, भाजपाचे वयोवृद्ध नेते लाल कृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, यांनी राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली आहे. तेदेखील शक्यतो कोरोनामुळे जात नाहीयत. राऊत म्हणाले, शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा पाया घातला. जर बाबरी ढाचा पाडला गेला नसता तर मंदिर उभारणे अश्यक्य होते.
 
राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने हे स्वीकारले आहे, की ज्यांनी वादग्रस्त बाबरी ठाचा पाडला, ते शिव सैनिक होते. त्यामुळे, ज्यांनी मंदिर उभारणीचा रस्ता साफ केला, ते आम्हीच होतो. म्हणून मंदिरा उभे राहत आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि आपण पाहीले, की उद्धव ठाकरे आणि आमच्या शिव सेनेने मंदिर उभारणीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण

Happy Friendship Day: इस्रायलनं 'हे' खास बॉलीवुड सॉंग ट्विट करत भारताला दिल्या शुभेच्छा 

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Web Title: Shiv sena leader sanjay raut hints cm uddhav thackeray will not join ram mandir bhoomi pujan Program ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.