"जे अखंड भारताचे फक्त स्वप्नच दाखवतात, तेच महाराष्ट्राचे शत्रू बनलेत," राऊतांची 'रोखठोक' टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 07:09 AM2022-05-01T07:09:12+5:302022-05-01T07:16:43+5:30

बाळासाहेब ठाकरे यांनी तोलामोलाचे राजकारण केले, पण ते मुख्यमंत्री वगैरे झाले नाहीत. त्यांनी अनेकांस त्या ‘पदावर’ बसवले व विकासात्मक कामे करून घेतली : राऊत

shiv sena leader sanjay raut slams saamna modi government bjp maharashtra mumbai balasaheb thackeray uddhav thackeray lata mangeshkar | "जे अखंड भारताचे फक्त स्वप्नच दाखवतात, तेच महाराष्ट्राचे शत्रू बनलेत," राऊतांची 'रोखठोक' टीका

"जे अखंड भारताचे फक्त स्वप्नच दाखवतात, तेच महाराष्ट्राचे शत्रू बनलेत," राऊतांची 'रोखठोक' टीका

googlenewsNext

"महाराष्ट्र स्थापनेस ६२ वर्षे झाली तरी ‘मुंबई कुणाची?’ हा प्रश्न कायम चर्चेत असतो. कारण देशाचे हे प्रमुख आर्थिक, औद्योगिक केंद्र महाराष्ट्रापासून वेगळे करावे यासाठी अमराठी धनिकांची अखंड धडपड आजही सुरूच आहे! जे अखंड हिंदुस्थानचे फक्त स्वप्नच दाखवतात तेच लोक महाराष्ट्राचे शत्रू बनले आहे," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

"महाराष्ट्राची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे? महाराष्ट्र अस्तित्वात येऊन ६२ वर्षे झाली व राज्याच्या निर्मितीचे उत्सव नित्यनेमाने साजरे होत आहेत. पण महाराष्ट्र आज कधी नव्हे इतका अशांत आणि अस्थिर झाला आहे. आदर्शाची हेटाळणी हा सध्याच्या महाराष्ट्रातील एक नवा चाळा होऊ पाहतो आहे. हे आता रोजच घडत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र सरकार साजरा करीत आहे. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्र अग्रस्थानी होता याचा विसर सध्याच्या केंद्रीय नेतृत्वास पडला आहे," असं म्हणत राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या रोखठोक या सदरातून केंद्रावर हल्लाबोल केला.

काय म्हटलं राऊत यांनी? 
२४ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मोदी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला आले. पंतप्रधान मुंबईत, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नावच त्या निमंत्रण पत्रिकेवर नाही. हा महाराष्ट्राचाच अपमान. लता मंगेशकर महाराष्ट्राच्या, त्यांना जाऊन चार महिने झाले नाहीत. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नावाने पुरस्कार दिला तो मोदींना पंतप्रधान म्हणून. त्यांचेही कर्तव्य होते ‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निमंत्रितांत नाहीत काय?’’ असे आयोजकांना विचारण्याचे. पण तसे घडले नाही. कारण महाराष्ट्राशिवाय देशाचे राजकारण सुरू झाले आहे आणि मराठी नेते काँग्रेस काळात नव्हते त्यापेक्षा जास्त दिल्लीचे गुलाम झाले आहेत. आजच्या महाराष्ट्र दिनी या स्थितीची खंत कोणाला वाटेल काय?, असा सवाल राऊत यांनी केला.

'बाळासाहेब कधी मुख्यमंत्री झाले नाहीत'
"शरद पवार हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते. महाराष्ट्र घडविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र घडविण्याबाबतचे योगदान वेगळय़ा पद्धतीचे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते एक व्यंगचित्रकार म्हणून फटकारे मारीत होते. पुढे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कांसाठी ते प्रत्यक्ष रणात उतरले. नंतर त्यांनी केलेली शिवसेनेची स्थापना व त्यातून उभा राहिलेला स्वाभिमानी महाराष्ट्र हे आदर्श कार्य आहे. मुंबईत शिवसेना नसती तर आज ती केंद्रशासित व्हायला वेळ लागला नसता. बाळासाहेब ठाकरे यांनी तोलामोलाचे राजकारण केले, पण ते मुख्यमंत्री वगैरे झाले नाहीत. त्यांनी अनेकांस त्या ‘पदावर’ बसवले व विकासात्मक कामे करून घेतली. शरद पवार हे अनेकदा मुख्यमंत्री व पेंद्रात मंत्री झाले. महाराष्ट्रातल्या औद्योगिक, सामाजिक जडणघडणीत त्यांनी काम केले. यशवंतरावांनी या कार्याची सुरुवात केली. शरद पवारांनी ते शिखरावर नेले," असंही त्यांनी नमूद केलंय.

मुंबई कोणाची?
"इतक्या वर्षांनंतरही मुंबई कोणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे. पण आधी ती महाराष्ट्राची आहे म्हणून हिंदुस्थानची आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थाने आजही पूर्णपणे संपलेली नाहीत. आधी मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे व एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळ्य़ाची पूर्ण कल्पना आहे. फडणवीस यांनी मुंबईत जे अमराठी पंचक निर्माण केले आहे, त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी करता येईल याचे एक ‘प्रेझेंटेशन’ तयार करून गृह मंत्रालयास सादर केले," असा आरोपही यात राऊत यांनी केलाय.

Web Title: shiv sena leader sanjay raut slams saamna modi government bjp maharashtra mumbai balasaheb thackeray uddhav thackeray lata mangeshkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.