रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री - संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 03:32 PM2020-03-06T15:32:04+5:302020-03-06T15:40:31+5:30

Uddhav Thackeray : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शरयू तिरावर आरती करणार नाहीत

shiv sena leader sanjay raut speaks about cm uddhav thackeray ayodhya visit ramlalla ram mandir rkp | रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री - संजय राऊत 

रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री - संजय राऊत 

Next
ठळक मुद्देउद्धव ठाकरे उद्या (शनिवारी) अयोध्या दौऱ्यावर 'रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री'आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय

मुंबई : रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. त्यामुळे आम्ही रामलल्लाचा प्रसाद मिळाल्याचे मानतो, असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (शनिवारी) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत येत आहेत. रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. आम्ही रामलल्लाचा प्रसाद मिळाला असे मानतो. उद्धव ठाकरे हे उद्या प्रथम लखनौला येतील. त्यानंतर लखनौहून रस्ते मार्गाने अयोध्येला येतील", असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत आल्यानंतर साडे तीन वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. त्यानंतर 4.30 वाजता रामलल्लांचे दर्शन घेतील. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते असणार आहेत. तसेच, अयोध्येत शांतता राहावी. मंदिर उभारणीतही शिवसेना सहभागी होऊ इच्छित आहे. त्याबाबत मुख्यमंत्रीच माहिती देतील. त्यांच्या दौऱ्याला कोणाचाही विरोध नाही आहे. मी सर्वांना भेटलो आहे. देशातील सर्वांनी रामलल्लाचे दर्शन घ्यावे अशी आमची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

याचबरोबर, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शरयू तिरावर आरती करणार नाहीत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत आहेत. त्यामुळे जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे." 

दरम्यान, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. तसेच, अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा दौरा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र, आता 7 मार्चला राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

Web Title: shiv sena leader sanjay raut speaks about cm uddhav thackeray ayodhya visit ramlalla ram mandir rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.