राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 12:36 PM2020-09-06T12:36:06+5:302020-09-06T12:39:04+5:30

सध्या राज्यात सुशांत सिंह राजपूत मृत प्रकरण प्रचंड गाजत आहे. यासंदर्भातत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज एनसीबीने रियाला 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

shiv sena leader sanjay raut tweet jai maharashtra post and shayari | राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

Next
ठळक मुद्देरिया चक्रवर्तीची आज (रविवार) एनसीबी कार्यालयात चौकशी आहे. खासदार संजय राऊत यांनी 'जय महाराष्ट्र' लिहीत एक शायरी ट्विट केली आहे.यावर भाजपा नेते संबित पात्रा यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रिया चक्रवर्तीची आज (रविवार) एनसीबी कार्यालयात चौकशी आहे. कंगना रणौत आणि संजय राऊत यांच्यात शाब्दी युद्ध पेटलेले आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक शायरी ट्विट करत 'जय महाराष्ट्र' लिहिले आहे. यावर भाजपा नेते संबित पात्रा यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी, 'जय महाराष्ट्र' असं ट्विट करत शायरी पोस्ट केली आहे. त्यांनी या शायरीतून म्हटले आहे, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूं." 

राऊतांच्या या ट्विटवर भाजपा नेते संबित पात्रा यांनीही पलटवार केला आहे. पात्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे, "हेच तर जग विचारतय... नेमकं “हवेली”मध्ये असं काय आहे, की “Drugs, Death & Dhoka” नावाच्या वादळाची दिशा आपण कोणत्याही परिस्थितीत वळवू इच्छिता. 

आजचा दिवस महत्वाचा -
सध्या राज्यात सुशांत सिंह राजपूत मृत प्रकरण प्रचंड गाजत आहे. यासंदर्भातत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज एनसीबीने रियाला 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

एनसीबीने यापूर्वीच रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला कोठडीत घेतले आहे. आता रियावरही अटकेची तलवार लटकत आहे.  एवढेच नाही, तर रियाच्या घराबाहेर पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. 

उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'
यापूर्वीही संजय राऊत यांच्या शायरीचा संबित यांनी समाचार घेतला होता. खासदार संजय राऊत यांनी 'संजय उवाच' म्हणत, ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटले होते, "उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों में भी जलते हुए मकान देखे है". यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र, असे लिहिले होते. राऊतांच्या या ट्विटवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पलटवार करत आणि कृष्ण उवाच म्हणत, "हे संजय: क्योंकि मैने आपको दिव्य चक्षु प्रदान किया है, जरा अपने समीप बैठे धृतराष्ट्र से कहिए की पुत्र मोह में वे इंद्रप्रस्थ गवाने जा रहे हैं," असे म्हटले होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा

Web Title: shiv sena leader sanjay raut tweet jai maharashtra post and shayari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.