Santosh Bangar : “बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही” म्हणणारे बांगरच शिंदे गटात, पाहा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 10:53 AM2022-07-04T10:53:51+5:302022-07-04T11:14:16+5:30
आता शिंदे सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना बघायला मिळेल.
विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना बघायला मिळेल. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेत भाजपचे राहुल नार्वेकर जिंकले. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे. पण बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. इतके दिवस उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे संतोष बांगर हेदेखील आता शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली आहे.
हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहे. संतोष बांगर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. त्यांनी काल शिंदे गटाच्या विरोधात मतदान केलं होतं. पण आज सकाळी ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे.
काय म्हणाले होते बांगर?
ज्या पक्षाने आमदार केले, त्या पक्षाला सोडून जाता, बेइमानी करता, अशा बेइमान लोकांचे काही भले होणार नाही. त्यांच्या बायका यांना सोडून जातील, या बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही. ते मुंजेच राहतील, अशा शब्दांत आमदार संतोष बांगर यांनी वसमत येथे भावना व्यक्त केल्या.
जिल्हा - ठाणे (5)
एकनाथ शिंदे - कोपरी-पाचपाखडी
प्रताप सरनाईक - ओवळा-माजिवडा
बालाजी किणीकर - अंबरनाथ
शांताराम मोरे - भिवंडी ग्रामीण
विश्वनाथ भोईर - कल्याण पश्चिम
जिल्हा - औरंगाबाद (5)
संजय शिरसाट - औरंगाबाद पश्चिम
रमेश बोरनारे - वैजापूर
प्रदीप जैस्वाल - औरंगाबाद मध्य
अब्दुल सत्तार - सिल्लोड
संदीपान भुमरे - पैठण
जिल्हा - जळगाव (4)
लता सोनवणे - चोपडा
किशोर पाटील- पाचोरा
चिमणराव पाटील - एरंडोल
गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण
जिल्हा - हिंगोली (1)
संतोष बांगर - कळमनुरी
जिल्हा - रायगड (3)
महेंद्र दळवी - अलिबाग
महेंद्र थोरवे - कर्जत
भरत गोगोवले - महाड
जिल्हा - उस्मानाबाद (2)
डॉ. तानाजी सावंत - परंडा
ज्ञानराज चौगुले -उमरगा-लोहारा
जिल्हा -सातारा (2)
शंभुराज देसाई - पाटण
महेश शिंदे - कोरेगाव
जिल्हा - मुंबई (5)
यामिनी जाधव - भायखळा
प्रकाश सुर्वे - मागाठाणे
सदा सरवणकर - दादर-माहिम
मंगेश कुडाळकर - कुर्ला नेहरुनगर
दिलीप लांडे - चांदिवली
जिल्हा - कोल्हापूर (1)
प्रकाश आबिटकर - राधानगरी
जिल्हा - नांदेड (1)
बालाजी कल्याणकर - नांदेड उत्तर
जिल्हा - यवतमाळ (1)
संजय राठोड - दिग्रस
जिल्हा - बुलडाणा (2)
संजय रायमुलकर - मेहकर
संजय गायकवाड - बुलडाणा
जिल्हा - पालघर (1)
श्रीनिवास वनगा - पालघर
जिल्हा - नाशिक (2)
सुहास कांदे - नांदगाव
दादा भुसे - मालेगाव बाह्य
जिल्हा - सोलापूर (1)
शहाजी पाटील - सांगोला
जिल्हा - सांगली (1)
अनिल बाबर - खानापूर
जिल्हा - रत्नागिरी (2)
योगेश कदम- दापोली
उदय सामंत - रत्नागिरी
जिल्हा - सिंधुदुर्ग (1)
दीपक केसरकर - सावंतवाडी