"...म्हणून आम्ही शांत! अन्यथा राणेंचं तोंड बंद करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकात; आम्ही आधी शिवसैनिक मग मंत्री"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 09:40 AM2021-07-31T09:40:25+5:302021-07-31T09:47:23+5:30

"नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते."

Shiv sena leader shambhuraj desai warns Narayan Rane | "...म्हणून आम्ही शांत! अन्यथा राणेंचं तोंड बंद करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकात; आम्ही आधी शिवसैनिक मग मंत्री"

"...म्हणून आम्ही शांत! अन्यथा राणेंचं तोंड बंद करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकात; आम्ही आधी शिवसैनिक मग मंत्री"

Next

मुंबई - नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने एकेरी भाषेत बोलत आहेत, त्याला जशास तसे उत्तर देण्याची आणि त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे. मात्र, आम्ही सय्यमी आहोत आणि आम्हाला सय्यम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहे. (Shiv sena leader shambhuraj desai warns Narayan Rane)

"नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते. त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री पद हे एक घटनात्मक पद आहे. त्या व्यक्तीबद्दल एकेरी भाषेत बोलणे, हे  राणेंसारख्या व्यक्तींना शोभत नाही. आम्ही सय्यमी आहोत आणि आम्हाला सय्यम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. नाही तर त्यांना तशाच भाषेत उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याची हिंमत आम्हा शिवसैनिकांत आहे. मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री. पण आम्हाला उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत, की या आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या मदतीकडे लक्ष द्या, त्यांना अडचणीतून बाहेर काढा. म्हणूनच आम्ही शांत आहोत. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत राणे जे एकेरी भाषेत बोलले, त्याला जशास तसे उत्तर देण्याची आमची ताकद आहे. पक्ष प्रमुखांनी आम्हाला शांत रहायला सांगितले आहे म्हणूनच आम्ही शांत आहोत," असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री राणे यांना दिला आहे.

Chiplun Flood : सीएम वगैरे गेले उडत; नारायण राणेंनी व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले होते राणे -
केंद्रीय मंत्री नारायण राणे पूरग्रस्त चिपळूणच्या दौर्यावर असताना तिथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने भडकले. याच वेळी तेथील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनीही त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतले. मात्र, याच वेळी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करताना त्यांचा तोल गेला. सीएम बीएम गेला उडत, असे वक्तव्य राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलताना केले.

राज्यावरील संकटं मुख्यमंत्र्यांचा पायगूण; पाय बघायला पाहिजे...; नारायण राणेंचा हल्लाबोल

नेमकं काय म्हणाले होते राणे? -
जिल्हाधिकाऱ्यांना बोलताना राणे म्हणाले, "सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगोत पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा," असं म्हणत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. "मला कोणीही सीईओ भेटले नाहीत. मी इथेच बाजारपेठेत उभा आहे. कोण सीईओ आहेत आणि कुठे आहेत हे मला दाखवा," असेही राणे म्हणाले होते. 
 

Web Title: Shiv sena leader shambhuraj desai warns Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.