कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, शिवसेनेच्या नेत्याला ह्दयविकाराचा झटका, विजय शिवतारे ICU त दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 04:00 PM2021-06-22T16:00:49+5:302021-06-22T16:03:52+5:30

मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहिती आहे. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आलं नाही. ते आहेत की नाही? याची सुद्धा विचारपूस केली नाही असा आरोप त्यांची कन्या ममता यांनी केला आहे.

Shiv Sena leader Vijay Shivtare admitted to ICU after heart attack, Daughter Mamata Lande FB Post | कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, शिवसेनेच्या नेत्याला ह्दयविकाराचा झटका, विजय शिवतारे ICU त दाखल

कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, शिवसेनेच्या नेत्याला ह्दयविकाराचा झटका, विजय शिवतारे ICU त दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असं सांगितले. माझा भक्कम आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती.माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय आणि विनस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बाबांनी केली.

पुणे – शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू आहेत. पत्नी मुलं यांच्यासोबत असलेल्या वादातून विजय शिवतारे यांची अशी दयनीय अवस्था घडल्याचं त्यांची मुलगी ममतानं आरोप केला आहे. याबाबत शिवतारेंची कन्या ममता लांडे शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून कौंटुबिक वाद जगासमोर आणला आहे. संपत्तीच्या वादातून मुलांकडून वडिलांचा मानसिक छळ सुरू असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे.

ममता लांडे या पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी फेसबुकवरून त्यांची व्यथा मांडली. या फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलंय?

मी ममता शिवदीप लांडे शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकिर्दित क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच यामागं मोठं कारण आहे. आज दि. २२ जून पहाटे ३ वाजता ब्रीच क्रँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझं भाग्य, मला त्यांनी फुलासारखं जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिलं. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरचं स्थान आहे. माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे. मागील काही दिवसांत फेसबुकवरून होत असलेल्या पोस्टनं आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण यामुळे माझे भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाला हानी पोहचेल असं त्यांना वाटत होतं व आजही वाटतं.

मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असं सांगितले. माझा भक्कम आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन त्यांना मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलिसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आलं नाही. ते आहेत की नाही? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांनी प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला.

आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय आणि विनस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून घेण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वत: डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा देत पूर्णवेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले. विनयाच्या धमक्यांकडे लक्ष दिलं नाही. मात्र दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. बदनामीच्या धमक्या दिल्या जात होत्या.

आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलेत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. बाबाही अविरत पुरंदरसाठी आपला जीव ओततील. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे ह्दयविकाराचा झटका आला. आयसीयूमध्ये रात्री २ वाजता मी त्यांना घेऊन आले, दाखल केले. माझी देवाला प्रार्थना आहे, मला बळ दे!

काही प्रश्न आहेत त्यावर नक्की आपणही सर्वांनी विचार करावा

१) ११९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात?

२) बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला?

३) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?

४) विनय शिवतारे आणि विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावलं?

५) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली… पण मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांसोबत असा व्यवहार कितीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का?

Web Title: Shiv Sena leader Vijay Shivtare admitted to ICU after heart attack, Daughter Mamata Lande FB Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.