शिवसेना नेते भेटले, पण प्रस्ताव नाही

By admin | Published: November 9, 2014 01:32 AM2014-11-09T01:32:51+5:302014-11-09T01:32:51+5:30

शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या काही मंडळींनी दिला होता, असा दावा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार यांनी केला होता.

Shiv Sena leaders met, but there is no proposal | शिवसेना नेते भेटले, पण प्रस्ताव नाही

शिवसेना नेते भेटले, पण प्रस्ताव नाही

Next
शरद पवार यांची आणखी एक गुगली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा संशयकल्लोळ
पुणो : शिवसेनेचे नेते भेटले, पण त्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही आणि अशा प्रस्तावात आम्हाला रस नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी एक राजकीय गुगली टाकत संशयकल्लोळ निर्माण केला.
   शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या काही मंडळींनी दिला होता, असा दावा   विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार यांनी केला होता. मात्र काँग्रेसने त्याचा ठाम इन्कार केला होता. आता मंत्रिपदावरून शिवसेना-भाजपामध्ये बोलणी सुरू असतानाच पवार यांनी केलेल्या विधानावरून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अशी कुठलीही भेट झाली नाही, असा खुलासा केला आहे.
 शनिवारी पुणो येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की राज्यात अस्थिरता नको म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आह़े त्याचा परिणाम राज्यात दिसत आह़े भाजपा आणि शिवसेना एकत्र आले तर सुंठेवाचून खोकला गेला़ स्थिर सरकार योग्य पद्धतीने चालते की नाही, ते आम्ही पाहू़  राज्याच्या हिताचे प्रस्ताव आल्यास आम्ही सहकार्य करू, असे त्यांनी सांगितल़े
यूपीए सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल मंत्रिपदावर असताना झालेल्या एअरबस खरेदीच्या निर्णयाची चौकशी करण्यात येणार आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की जरूर चौकशी कराव़ इतरही काय चौकशा करायच्या त्या करून टाका़ 
मोदी सरकार आल्यापासून गेल्या 4 ते 5 महिन्यांत कृषी उत्पादनाबाबत काळजी करावी, असे दिसायला लागले आह़े संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्यावर केंद्र शासनाची भूमिका पाहून योग्य तो निर्णय घेऊ़ 
बाळासाहेब विखे यांनी भाजपाला पाठिंबा देण्याच्या सूचनेबाबत ते म्हणाले, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आह़े आम्ही कोणाला सांगणार! बाळासाहेबांना सर्वच गोष्टींवर मार्गदर्शन करण्याची सवय आहे, असा चिमटाही पवार यांनी काढला. (प्रतिनिधी)
 
ऊस, कापसाच्या हमीभावाचा गांभीर्याने विचार करावा
च्ऊस आणि कापसाच्या हमीभावाचा केंद्र व राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा़ हा विषय खूप संवेदनशील असून, त्यात निर्णय झाले नाही तर व्यापक परिणाम होतील़ शासन उत्पादक शेतक:यांचा नक्की विचार करेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली़
 
च्पवार म्हणाले, कापूस उत्पादकांना रास्त भाव मिळावा, यासाठी राज्य शासनाने नेहमीच काळजी घेतली आह़े सहकार मंत्री पाटील यांनी कापूस खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल, असे सांगितले आह़े यंदा नाफेडने खरेदी करणो शक्य नाही, असे कळविले आह़े कापसाची खरेदी थांबली तर बाजारात व्यापारी काय भावाने खरेदी करेल याची शाश्वती देता येत नाही़ राज्य शासनाने पूर्वीचे कापूस खरेदी धोरण चालू ठेवाव़े त्यासाठी शासनाने नाफेडला निधी, बँक गॅरंटी उपलब्ध करून द्यावी आणि कापूस उत्पादकांना गतवर्षीइतका किमान हमीभाव द्यावा, अशी मागणी त्यांनी केली़ 
च्यंदा साखरेच्या किमती पडल्या आहेत़ हमीभाव देण्यासाठी कारखान्यांची स्थिती नाही़ गतवर्षीही अशीच परिस्थिती होती़ तेव्हा साखर एक्साइज रकमेतून कर्ज देऊन त्याचे व्याज केंद्र शासनाने भरले होत़े उसाला भाव देण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले होत़े
 
राजू शेट्टी, चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य
केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आह़े सत्ताधा:यांमध्ये ऊस उत्पादकांसाठी संघर्षाची भूमिका घेणारे त्यात आहेत़ राज्य शासनाने प्राधिकरणाची स्थापना केली आह़े त्यात तेही आहेत़ तेव्हा आता शेतक:यांच्या सर्व मागण्या मान्य होतील, असे वाटत असल्याचे सांगत पवार यांनी राजू शेट्टी आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केल़े सहकारमंत्री कोल्हापूरचे आहेत़ ते ऊस उत्पादकांना दिलासा देतील, अशा शब्दांत त्यांनी सहकार मंत्री पाटील यांची फिरकी घेतली़ बाजार समित्या बरखास्त केल्याविषयी ते म्हणाले, शासनाने आता लवकर निवडणुका घेऊन लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या हातात कारभार जावा, अशी भूमिका स्पष्ट केली.
 
एलबीटीचे आश्वासन पाळावे
एलबीटी प्रश्नावर पूूर्वीच्या सरकारबरोबर व्यापा:यांची संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती़ एलबीटी रद्द करण्याचे भाजपाने लेखी आश्वासन दिले असल्याचे व्यापारी महासंघाचे म्हणणो आह़े त्यांची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितल़े
सीईओसाठी कायदा करावा लागेल
मुंबईसाठी वेगळा प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा विषय 1क्-12 वर्षापूर्वी चर्चेत आला होता़ महापालिकेत हस्तक्षेप केल्यासारखे होईल म्हणून तेव्हा विरोध झाला होता़ या निर्णयासाठी कायदा करावा लागेल, असे पवार यांनी सांगितल़े 
पवारांनी घेतले एनकुळ गाव दत्तक
राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एनकुळ गाव दत्तक घेतले आह़े संसद सदस्यांनी एका गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आह़े याविषयी पवार म्हणाले, याबाबत आम्हाला पत्र आले आह़े पूर्वीच्या आपल्या माढा लोकसभा मतदारसंघातील खटाव तालुक्यातील हे एक दुष्काळी गाव आह़े या गावात आपण अजूनर्पयत गेलो नाही़ 2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत या गावात आपल्याला 94 टक्के मते मिळाली होती़ काही लोकांनी विनंती केली़ तेव्हा इतकी मते देणारे हे कोण आहेत हे पाहावे, असा विचार करून या गावाची निवड केली आह़े
 

 

Web Title: Shiv Sena leaders met, but there is no proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.