काँग्रेसमुळे मुंबईत होणार शिवसेनेचा महापौर?

By admin | Published: March 2, 2017 11:31 AM2017-03-02T11:31:30+5:302017-03-02T11:31:30+5:30

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहणार आहे

Shiv Sena mayor for Congress? | काँग्रेसमुळे मुंबईत होणार शिवसेनेचा महापौर?

काँग्रेसमुळे मुंबईत होणार शिवसेनेचा महापौर?

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - 8 तारखेला मुंबई महानगर पालिकेच्या महापौरांची निवड होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजपाला भरघोस मते दिली पण स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नाही. भाजपाकडे 83 आणि शिवसेनेकडे 89 नगरसेवक आहेत. त्यामुळे मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका भाजपा-शिवसेनासाठी महत्वाची ठरणार आहे. टिव्ही वृत्तानसार, मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहणार आहे. जर काँग्रेस तटस्थ राहिल्यास शिवसेनेला फायदा होणार आहे. कारण भाजपा पेक्षा शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत. 

महापालिका निवडणुकीत तटस्थ राहून सेना, भाजपच्या बाजूनं नसल्याचं कॉंग्रसेला दाखवता येईल तसेच नगरसेवक फुटल्यास होणारी नाचक्कीही टाळता येईल.

Web Title: Shiv Sena mayor for Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.