शिवसेना आमदार बाळा सावंत यांचे निधन
By Admin | Published: January 9, 2015 09:46 AM2015-01-09T09:46:44+5:302015-01-09T11:00:26+5:30
शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचे गुरूवारी रात्री मुंबईत निधन झाले.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचे गुरूवारी रात्री मुंबईत निधन झाले. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी वांद्रे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बाळा सावंत हे आजारी होते, त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबईत महानगरपालिकेत तीन वेळा नगरसेवक असलेले सावंत हे ठाकरे कुटुंबियांच्या जवळचे मानले जात असत. २००९ साली ते वांद्रे मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून वांद्रे मतदारसंघाची ओळख बनविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या कृष्णा पारकर यांचा पराभव करत ते सलग दुस-यांदा आमदार बनले.