'उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून ही उडी मारू'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 10:24 AM2019-11-07T10:24:56+5:302019-11-07T10:29:41+5:30
राज्यात सुरु असलेल्या सत्तेस्थापनेच्या राजकीय घडामोडींनीवर आज परदा पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : विधनासभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस उलटले असताना सुद्धा भाजप-शिवसेनेमधील सत्तेस्थापनेचा तिढा काही सुटू शकला नाही. मात्र दोन्ही पक्षात सुरु असलेला सत्तासंघर्षाला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलवली आहे. तर बैठकीत उद्धव ठाकरे हे जी भूमिका घेतली ती सर्व आमदारांना मान्य असतील असे शिवसेनेचे पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलताना शिवसेना आमदार भुमरे म्हणाले म्हणाले की, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे हे, जो आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. तर उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचे आदेश दिले तर, ते ही करू अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिकिया दिली आहे. .
राज्यात सुरु असलेल्या सत्तेस्थापनेच्या राजकीय घडामोडींनीवर आज परदा पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी आज ११ वाजेच्या सुमारास शिवसेना आमदार यांची बैठक बोलवली आहे. तर शिवसेना आमदार फुटण्याची शक्यात असल्याने ही बैठक बोलवली असल्याचे बोलले जात आहे. तसेच या बैठकीत शिवसेनच्या अंतिम भूमिकेचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर त्याचप्रमाणे तिकडे भाजपनेते सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहे. तसेच या भेटीत भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा केला जाऊ शकतो. त्यामुळे सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आजचा दिवस राज्यातील राजकीय घडामोडीसाठी महत्वाचा ठरणार आहे.