शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना पोलीस कोठडी

By admin | Published: June 16, 2016 09:07 PM2016-06-16T21:07:14+5:302016-06-16T21:11:35+5:30

शिवसेनेचे उपनेते व जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना आज न्या.एस.पी. देवरे यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

Shiv Sena MLA Gulabrao Patil, a police cell | शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना पोलीस कोठडी

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना पोलीस कोठडी

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 16-  म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत नवीन कार्यकारिणी गठीत करून फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी शिवसेनेचे उपनेते व जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना आज न्या.एस.पी. देवरे यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

न्यायालयात आले सकाळी ११ वाजता शरण

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून आमदार गुलाबराव पाटील यांनी आधी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज २४ मे २०१६ रोजी न्यायाधीश ए. के. पटणी यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. तेथेही १३ जून रोजी अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अखेर गुलाबराव पाटील १६ जून रोजी जळगाव येथील न्या.एस.पी. देवरे यांच्यापुढे सकाळी ११ वाजता शरण आले. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्या. देवरे यांनी त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

काय आहे प्रकरण ?

१९९१ मध्ये म्हसावदच्या पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना झाली होती. त्यानंतर २०१२ पर्यंत संस्थेचे ६ सभासद हे मयत झाले होते. असे असताना आमदार गुलाबराव पाटील यांनी २० एप्रिल २००८ रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अजेंडा काढला. त्यानंतर ३० एप्रिल २००८ रोजी ही सभा घेण्यात आली. संस्थेचे सभासद महारू काशीनाथ बेलदार हे १८ आॅगस्ट १९९६ रोजी मयत झालेले असताना ते सभेला हजर असल्याचे दाखवण्यात आले. तसा उल्लेख प्रोसेडिंगमध्ये करून सभेत नवीन कार्यकारिणी गठीत केली होती. याप्रकरणी अर्जुन लटकन पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून २०१२ मध्ये औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुलाबराव पाटलांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: Shiv Sena MLA Gulabrao Patil, a police cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.