मराठवाडयातील १०० तरुण 'इसिस'मध्ये - शिवसेना आमदार
By Admin | Published: July 22, 2016 08:18 PM2016-07-22T20:18:25+5:302016-07-22T20:18:25+5:30
मराठवाडयामधील परभणीतून १०० तरुण बेपत्ता झाले आहेत आणि ते 'इसिस'मध्ये दाखल झाले असतील असे खळबळजनक विधान शिवसेनेचे परभणी येथिल आमदार राहूल पाटील यांनी केले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ : मराठवाडयामधील परभणीतून १०० तरुण बेपत्ता झाले आहेत आणि ते इसिसमध्ये दाखल झाले असतील असे खळबळजनक विधान शिवसेनेचे परभणी येथिल आमदार राहूल पाटील यांनी केले आहे. ते विधानसभेत बोलत होते. 'इसिस' या अतिजहाल दहशतवादी संघटनेला भारतात विशेष प्रभाव पाडता आला नसला तरी शिवसेनेचे आमदार राहूल पाटील यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसात टइसिसटच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच परभणीच्या नासीरबीन चाऊसला नुकतीच 'इसिस'च्या संपर्कात आल्याच्या आरोपातून अटक झाली आहे. त्याने बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्याचाही खुलासा समोर आला आहे. या अटकेनंतर एमआयएमच्या नेत्यांनी युवकांना भडकावून घोषणाबाजी दिल्या. देशविरोधी कारवायांना एसआयएम पाठिबा देत असल्याचा आरोप यावेळी राहुल पाटील यांनी केला. सोबतच एमआयएमची मान्यताच कायमस्वरूपी रद्द करावी अशीही मागणी आमदार राहूल पाटील केली.
दरम्यान, एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. इसिसच्या विरोधात आवाज उठवणारी एमआयएमही पहिली पार्टी असल्याचं ते म्हणाले