एकदा समोरासमोर होऊनच जाऊदे...; आमदार संजय गायकवाडांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 01:54 PM2023-05-26T13:54:44+5:302023-05-26T13:55:14+5:30

भाजपने आमच्या गळ्यावर सुरा नाही तर एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ टाकली आहे असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad targets MP Sanjay Raut | एकदा समोरासमोर होऊनच जाऊदे...; आमदार संजय गायकवाडांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

एकदा समोरासमोर होऊनच जाऊदे...; आमदार संजय गायकवाडांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

googlenewsNext

बुलढाणा - संजय राऊत सारखा आमच्यावर टीका करतो. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये कुठेही सांग. एकदा जरा समोरासमोर होऊनच जाऊदे, संजय राऊत यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. संजय राऊत कसा नौटंकी आहे. हे सिद्ध करून दाखवतो असं आव्हान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिले आहे.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, आत्ता आम्हाला ५ जागा मिळणार आहे की २२, आम्ही किती लढवायचं आहे, तो आमचा पक्ष आहे ना. तू चोमडेगिरी कशाला करतो. हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमच्या वाट्याला काय देणार हे प्रकाश आंबेडकर बोलले. महाविकास आघाडीपासून सावध राहण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला माना. तुमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर काय औकात ठेवणार आहे ते पहा जरा असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत अशा कोणी टपरुटने आम्हाला पक्ष म्हणून नाही मानलं तर आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. आमचा पक्ष हा संख्येच्या बळावर मान्यताप्राप्त पक्ष आहे. म्हणून कोणी एखाद्या संजय राऊतसारखा आम्हाला पक्ष म्हणून मानलं, नाही मानलं आम्हाला काही फरक पडत नाही. भाजपने आमच्या गळ्यावर सुरा नाही तर एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ टाकली आहे. तुम्ही एकनाथ शिंदेंचा एन्काऊंटर कराण्याचे प्रयत्न चालू होते.  त्यांची झेड प्लस सुरक्षा काढून एकनाथ शिंदेंना खतम करण्याचे प्लॅनिंग सुरू होते असा आरोपही आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. 

दरम्यान, आमच्यामध्ये बोलायची तुम्हाला काय गरज आहे? या चोमड्या संजय राऊतला कोण सल्ला विचारत आमच्याबद्दल बोलायचं. तू तुझं घर सांभाळ, अजितदादाला सल्ला वेगळं देतो. त्या नाना पटोलेला वेगळा सल्ला देतो. अरे चोमडेगिरी करतो कशाला. हे स्वत: आमच्या ५० आमदारांच्या मतदानावर खासदार आहेत असंही गायकवाडांनी सांगितले. 

Web Title: Shiv Sena MLA Sanjay Gaikwad targets MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.