भाजपच्या मंत्र्याविषयी शिवसेना आमदारांची तीव्र नाराजी

By admin | Published: July 20, 2016 08:19 PM2016-07-20T20:19:05+5:302016-07-20T20:19:05+5:30

राज्यातील सत्ता टिकविण्यापुरताच शिवसेनेच्या आमदारांचा सध्या राज्यात वापर सुरु असून भाजप मंत्री त्यांना किंमत देत नसल्याची सल मुंबईत बुधवारी झालेल्या

Shiv Sena MLAs angry over BJP's minister | भाजपच्या मंत्र्याविषयी शिवसेना आमदारांची तीव्र नाराजी

भाजपच्या मंत्र्याविषयी शिवसेना आमदारांची तीव्र नाराजी

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 20 -  राज्यातील सत्ता टिकविण्यापुरताच शिवसेनेच्या आमदारांचा सध्या राज्यात वापर सुरु असून भाजप मंत्री त्यांना किंमत देत नसल्याची सल मुंबईत बुधवारी झालेल्या पक्षाच्या प्रमुख आमदारांच्या बैठकीत व्यक्त झाली. विधानभवनातील एका कॅबिनेट मंत्र्याच्या दालनात ही बैठक झाली. शिवसेनेने विभागांसाठी नेमलेले प्रतोद यांच्यासह प्रमुख मोजकेच आमदार बैठकीस उपस्थित होते.
ही नाराजी व्यक्त होवून आमदार तिथेच थांबले नाहीत. त्यांनी तातडीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बैठकीतूनच फोन लावला. त्यांच्या कानांवर ही नाराजी घालण्यात आली. येत्या चार दिवसांत त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून ही नाराजी व्यक्त करण्याचा व पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या आमदारांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. पालकमंत्र्यांकडून मागितलेला निधी दिला जात नाही. कोणत्याही जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री नवीन घोषणा अथवा निधी वितरित करायचा झाल्यास त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवारास बोलवून त्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला जातो. हे आम्ही आणखी किती दिवस सहन करायचे अशी संतप्त विचारणा या बैठकीत झाली.
भाजप मंत्र्यांच्या या आडवणूकीमुळे यापुढील काळात शिवसेना आमदारांना निवडणूका लढविणे अवघड होणार असल्याची भिती व्यक्त झाली.

Web Title: Shiv Sena MLAs angry over BJP's minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.