शिवसेनेवर मोदी नाराज !

By admin | Published: July 27, 2014 02:32 AM2014-07-27T02:32:55+5:302014-07-27T02:32:55+5:30

‘शॉल आणि साडी डिप्लोमसी’चा उल्लेख करीत पाकिस्तानसोबतच्या धोरणावरून एनडीए सरकारवर शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे नाराज झाले आहेत.

Shiv Sena Modi angry! | शिवसेनेवर मोदी नाराज !

शिवसेनेवर मोदी नाराज !

Next
नवी दिल्ली : ‘शॉल आणि साडी डिप्लोमसी’चा उल्लेख करीत पाकिस्तानसोबतच्या धोरणावरून एनडीए सरकारवर शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे नाराज झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोदी यांनी आपल्या दूतामार्फत संदेश देऊन राजकारणाच्या वादात आपल्या आईला ओढू नये, अशी समज दिल्याचे समजते. 
भारत-पाक संबंधांबाबतच्या चर्चेत विरोधकांनीही अशी टीका केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेनंही आईला मध्ये आणून वैयक्तिक हल्ला करू नये, असे मोदींनी आपल्या पत्नात सूचित केल्याचे कळत़े  त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या संबंधांत पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
   जम्मूमधील अखनूरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाला होता, तर दोन जवान जखमी झाले होते. या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले होते. शिवसेना तर आक्रमक झाली होती. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी शिवसेना खासदार राजकुमार धूत यांनी राज्यसभेत केली होती. 
त्याच वेळी खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानचे दहा सैनिक मारा, असं ठणकावलं होतं.  (विशेष प्रतिनिधी)
 
काय आहे ‘साडी आणि  शॉल डिप्लोमसी’..
पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मोदींनी आपल्या शपथविधीसाठी आमंत्रित केलं होतं. त्या वेळी त्यांनी शरीफ यांना त्यांच्या आईसाठी शॉल भेट दिली होती, तर शरीफ यांनी नंतर मोदींच्या आईसाठी खास साडी पाठवली होती. या शॉल-साडी देवाणघेवाणीचा विषय शिवसेनेने राजकारणात आणल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केली.
 
1साडी आणि शॉल डिप्लोमसी काय आहे, असे विचारत पाकबरोबर चर्चा करू नये, ही सेनेची भूमिका  आहे. चर्चेने काहीही साध्य होणार नाही. 
 
2आपण फक्त शहीद जवानांची संख्या मोजणार आहोत का, असा संताप खा. राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यातील ‘साडी आणि  शॉल डिप्लोमसी’चा उल्लेख नरेंद्र मोदींना खटकला आहे. 
 
3त्याबद्दलची आपली नाराजी त्यांनी उद्धव ठाकरे यांना कळवल्याचे समजते. या संदर्भात संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला यावर काहीच बोलायचं नाही एवढेच मोघम उत्तर दिले. 

 

Web Title: Shiv Sena Modi angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.