Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचं देशाचं नेतृत्व, शिंदे गट त्यांना घाबरला म्हणूनच...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 03:28 PM2022-08-25T15:28:02+5:302022-08-25T15:29:31+5:30

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही, असा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

shiv sena mp arvind sawant replied eknath shinde group over criticism on aaditya thackeray in maharashtra assembly | Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचं देशाचं नेतृत्व, शिंदे गट त्यांना घाबरला म्हणूनच...”

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचं देशाचं नेतृत्व, शिंदे गट त्यांना घाबरला म्हणूनच...”

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे हे उद्याचे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं याचा अर्थ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला ते घाबरतात. त्यांना कळून चुकलेय की, उद्याचे देशाचेही नेतृत्व कदाचित ते होतील. मग त्यांना बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले आहे. आताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या शिंदे-भाजप सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. 

शिंदे गट आणि भाजपकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले. यावरून शिवसेनेच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून चांगलेच सुनावले आहे. एक दूरदृष्टी असणारा तरुण मुलगा एका वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र आणि मुंबईचे नेतृत्व करत होता. दावोसमध्ये ज्याची मुलाखत घेण्यासाठी जगातील सगळे चॅनल धावले, त्या आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही. जे कुणी हे करत आहेत, त्यांची प्रतिमा मात्र नक्कीच कळेल की कोण कुणावर भुंकतेय, असे सांगत विरोधकांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

ते आणखी पायऱ्यांवरून खाली जात जाणार, वर नाही जाणार

त्यांची अब्रू केव्हाच गेली आहे. लोकांच्या सगळे लक्षात आले आहे. अनेक व्हिडिओ क्लिप आहेत की ज्यात ते म्हणत आहेत की आम्हाला अमुक पैसे मिळाले वगैरे. त्यामुळे अब्रू केव्हाच गेली. जो बूंद से गई, हौद से नही आएगी. कितीही पायऱ्यांवर उभे राहा. ते आणखी पायऱ्यांवरून खाली जात जाणार, वर नाही जाणार, अशी बोचरी टीका करत, हे सरकारच बेकायदेशीर आहे. हे देवेंद्र फडणवीसांना कळतंय की हे सगळे बेकायदेशीर आहे. पण अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण भाजप देशात रुजवतेय. ते स्वत:चीच कबर खोदत आहेत. हे प्रकार महाराष्ट्राला भूषणावह नाही, असे अरविंद सावंत यांनी सुनावले.

नितीन गडकरींचे किती खच्चीकरण केले गेले

नितीन गडकरींचे किती खच्चीकरण केले गेले. त्यांचे पाय कापून टाकले. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की या सरकारमध्ये सामील होणार नाही. दोन मिनिटांत दिल्लीवरून आदेश आला शपथ घ्या. घेतली त्यांनी शपथ. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केले. सगळी खाती अंगाशी घेऊन याने कारभार होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला पळवले. जे अलिबाबाचे ४० मित्र तिकडे गेले, त्यांना विचारायला हवं की त्यांना याची जनाची नाही, मनाची तरी लाज आहे का? असा संतप्त सवाल सावंत यांनी केला.

दरम्यान, शिंदे गटाच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला. "महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज...२०१४ ला १५१ चा हट्ट धरुन युती बुडवली. २०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्ववादी विचारधारा पायदळी तुडवली. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर. पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन...खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार...जनता हे खोटे अश्रू पूसणार नाही... तुमच्या या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही. युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली", अशा आशयाचा बॅनर शिंदे गटातील आमदारांनी हातात धरला. 
 

Web Title: shiv sena mp arvind sawant replied eknath shinde group over criticism on aaditya thackeray in maharashtra assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.