“उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 06:41 PM2022-05-10T18:41:36+5:302022-05-10T18:42:56+5:30

आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

shiv sena mp arvind sawant taunts mns raj thackeray over ayodhya visit and hindutva | “उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

“उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

Next

मुंबई: मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) कमालीचे आक्रमक झालेले आहेत. त्यात भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा वाजवून आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिल्यापासून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी राज्य सरकारकडून सक्त कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले असून, यामध्ये राज्य सरकारच्या कारवाईवर तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शिवसेनेकडून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.  

राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझे म्हणणे ऐकले नाही, माफी मागितली नाही तर वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. बृजभूषण सिंह यांच्यासह स्थानिक संघटनांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला असताना आता राज ठाकरेंचे नाव न घेता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून माध्यमांशी बोलताना टीका केली आहे. 

सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात 

हिंदुत्वाची रस्सीखेच कसली? ज्यांच्याकडे रस्सीच नाही, त्यांनी खेचायचे काय? रस्सी विचारांची असली पाहिजे. सरडाही रंग बदलतो. कदाचित त्यालाही लाज वाटेल, इतके लोकांनी रंग बदललेत. सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात. असली-नकली लोकांना कळते, अशी घणाघाती टीका अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. 

असली कोण आहे हे त्यांना कळले आहे

राज ठाकरेंना विरोध करतानाच अयोध्येमध्ये आदित्य ठाकरेंचे स्वागत करण्याची भूमिका बृजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. यावर, आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे. 

दरम्यान, देशाला हिंदुत्वाचा विचार कुणी दिला? शिवसेना प्रमुखांनी. गेले ३ वर्ष तेच तुणतुणे वाजवत आहेत. उद्धव ठाकरे संयमी आहेत. त्यांनी तमाशा पाहून घेतलेला आहे. १४ मेला या. त्या तुणतुण्याची तार कशी तुटते, ती बघा, अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. 
 

Web Title: shiv sena mp arvind sawant taunts mns raj thackeray over ayodhya visit and hindutva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.