मंत्रिपदांबाबत शिवसेनेचे फार लाड नाहीत!

By admin | Published: May 18, 2014 12:16 AM2014-05-18T00:16:18+5:302014-05-18T00:16:18+5:30

शिवसेनेसह एनडीएतील मित्र पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात पतिनिधीत्व देताना त्यांचे फार लाड करायचे नाहीत.

Shiv Sena is not very fond of ministers! | मंत्रिपदांबाबत शिवसेनेचे फार लाड नाहीत!

मंत्रिपदांबाबत शिवसेनेचे फार लाड नाहीत!

Next
>एक कॅबिनेट : ..अन् फार तर दोन राज्यमंत्रिपदे देण्याची शक्यता
यदु जोशी/गजानन जानभोर
 - नवी दिल्ली
शिवसेनेसह एनडीएतील मित्र पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात पतिनिधीत्व देताना त्यांचे फार लाड करायचे नाहीत.त्यांच्या अटी-शर्त्ीना भीक घालायची नाही, असे धोरण भाजपा आणि विशेषत: स्वत: नरेंद्र मोदी यांनी ठरविल्याचे समजते. 
अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना शिवसेनेचे 12 खासदार होते आणि पक्षाला 2 कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळालेले होते. एकदा तर लोकसभेचे अध्यक्षपद शिवसेनेचे मनोहर जोशी यांच्याकडे होते. यावेळी शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले असल्याने आपल्याला जादा मंत्रिपदे मिळावीत, असा आग्रह धरला जाईल. भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या दबावाखाली येण्याची गरज उरलेलीे नाही. शिवसेनेच्या मुखपत्रतून मोदी यांच्यावर टीका करणारे अग्रलेख ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आल्याचे मोदी यांच्या मनात अजूनही आहे. शिवाय, मराठी-गुजराती वादाबाबत मुखपत्रतून घेण्यात आलेली भूमिकाही मोदी आणि भाजपालाही रुचलेली नाही, हेही एक कारण सांगितले जाते. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्री पद दिले जाईल आणि फारच विनंती केली गेली तर एखादे राज्यमंत्री पद  दिले जाईल, असा तर्क आहे.  
 
मंत्रिमंडळात गडकरी, मुंडेंसोबत अहीर, दानवे, वनगा अन पीयूष गोयल!
च्भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नव्या केंद्र सरकारमध्ये निश्चितपणो वर्णी लागणार आहे. सोबतच रावसाहेब दानवे, हंसराज अहीर, चिंतामण वनगा आणि पीयूष गोयल यांचा समावेश केला जाईल, अशी दाट शक्यता आहे.
च्गडकरी आणि मुंडे यांना अत्यंत महत्त्वाचे खाते दिले जाणार आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर त्यात दोघांचीही महत्त्वाची भूमिका राहील असे सुरुवातीपासूनच म्हटले जात होते. 
 
च्या दोघांच्या जोडीला राज्यातून ज्या खासदारांची वर्णी लागेल त्यात चंद्रपूरचे चवथ्यांदा खासदार असलेले हंसराज अहीर आणि जालन्याचे रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. कदाचित त्यांच्याकडे राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र कार्यभारदेखील दिला जावू शकतो, असे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले.
च्पालघरमधून विजयी झालेले चिंतामण वनगा यांना आदिवासी म्हणून संधी दिली जाईल.अनुसूचित जमातीसाठी महाराष्ट्रात राखीव असलेल्या चारही जागा यावेळी भाजपाने जिंकल्या आहेत. त्यात पालघर,गडचिरोली, नंदुरबार आणि दिंडोरीचा समावेश आहे.
च्राज्यसभेचे सदस्य आणि पक्षाचे कोषाध्यक्ष पीयूष गोयल यांचे नावही राज्यमंत्रिपदासाठी निश्चित असल्याचे मानले जाते. 
च्विदर्भातून दोन, मराठवाडय़ातून दोन, मुंबई,ठाण्यातून दोन अशा सहा जणांची पहिल्या टप्प्यात वर्णी लागेल, असे सांगण्यात आले. 
च्गोवा या छोटेखानी राज्यातून दोन्ही खासदार भाजपाचे निवडून आले आहेत. तेथून श्रीपाद नाईक यांना संधी दिली जाईल, असे समजते. 
 
गडकरींना हवे विकासात्मक खाते
पोटोकॉल, टॉप थ्रीचे मंत्रीपद हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. देशात मोठे पायाभूत पकल्प उभारता येतील, जनहिताचे भव्य पकल्प उभारता येतील असे खाते द्या, असा आग्रह माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी धरला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी घ्यावे असा पक्षात एक प्रवाह होता पण त्यांनी आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. या पाश्र्वभूमीवर, गडकरी यांना पायाभूत सुविधांशी संबंधित रेल्वे, भूपृष्ठ वाहतूक असे खाते दिले जावू शकते.संबंधित महत्त्वाची खाती एकत्र करून त्यांची जबाबदारी गडकरींकडे दिली जावू शकते. 
 

Web Title: Shiv Sena is not very fond of ministers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.